Kerala : केरळमधील तिरुअनंतपुरम येथील २३ वर्षीय रेडिओलॉजीच्या विद्यार्थ्याच्या मृत्यूप्रकरणी तिरुअनंतपुरम पोलिसांनी एक धक्कादायक खुलासा केला आहे. शेरोन राज नामक विद्यार्थ्यांचा खून त्याची गर्लफ्रेंड गरिष्मा हिने केल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. तिने शेरोनला १४ ऑक्टोबरला भेटण्याच्या बहाण्याने घरी बोलावले आणि त्याच्या ज्यूसमध्ये कीटकनाशक मिसळून प्यायला दिले.
यानंतर शेरोन त्याच्या घरी गेला. परंतु, घरी पोहोचताच त्याची प्रकृती ढासळली. शेरोनच्या भावाला माहित होते की, तो गरिष्माच्या घरी गेला आहे, म्हणून त्याने फोन करून तिला विचारले की, ‘तू शेरॉनला काही खायला दिले आहेस का?’ यावर गरिष्माने नाही असे उत्तर दिले.
त्यानंतर शेरोनच्या कुटुंबियांनी त्याला बेशुद्ध अवस्थेत घेऊन हॉस्पिटल गाठले. मात्र ११ दिवसांनंतर २५ ऑक्टोबर रोजी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. शेरोनचा मृत्यू विषबाधा झाल्याने झाला असल्याचे वैद्यकीय अहवालात स्पष्ट झाले. दरम्यान, पोलिसांनी तपास सुरू केला तेव्हा गरिष्माचीही चौकशी करण्यात आली.
मात्र, पोलिसांना आधीच तिच्यावर शंका आली होती. सुरुवातीला ती पोलिसांची दिशाभूल करत राहिली. पण ३० ऑक्टोबरला गरिष्माने आपला गुन्हा कबूल केला. तिने सांगितले की, ती गेल्या एक वर्षापासून शेरोनसोबत रिलेशनशिपमध्ये होती. मात्र, त्याच दरम्यान तिचे लग्न दुसऱ्या मुलाशी निश्चित झाले. परंतु, त्यानंतरही शेरोन आणि गरिष्माचे अफेअर सुरूच होते.
परंतु, लग्नाची तारीख जवळ येताच गरिष्माला हे नाते संपवायचे होते. या मुद्द्यावर तिने शेरोनशीही चर्चा केल्याचे सांगण्यात आले. पण त्याने ते मान्य केले नाही. तिने त्याला प्रेमाने समजावण्याचाही प्रयत्न केला. पण शेरोन तिला सोडायला तयार नव्हता.
गरिश्माने सांगितल्यानुसार, शेरोनपासून दूर जाण्यासाठी तिने एक बहाणाही केला की, तिच्या कुंडलीत दोष असल्याने तिचा पहिला नवरा मरणार असल्याचे पंडितने सांगितले आहे. तरीही शेरोनला ते मान्य नव्हते. त्यानंतर तिने शेरोनला आपल्या मार्गातून दूर करायचे ठरवले. त्यामुळे गरिष्माने शेरोनला घरी बोलावले आणि त्याच्या ज्यूसमध्ये कीटकनाशक मिसळले, त्यामुळे त्याचा मृत्यू झाला.
महत्वाच्या बातम्या
Recipe : चिकन मटन बनवताना ‘हे’ दोन मसाले त्यात टाका.! येईल जबरदस्त चव; हाॅटेलची भाजीही पडेल फिकी
KL Rahul : ‘सगळ्यात आधी के एल राहूलला टिम इंडीयातून बाहेर हाकला’
shivsena : बंडखोर खासदारांच्या मतदारसंघात स्वतः उद्धव ठाकरे खिंडार पाडणार? ‘असा’ आहे प्लान B
Virat Kohli : विराट कोहलीची एक चूक पडली महागात; भारतीय संघाला गमवावा लागला सामना