VIDEO: सुई पाहून तरुणी चांगली घाबरली; आरोग्य कर्मचाऱ्यांनी ‘ही’ भन्नाट ट्रिक वापरत तिला दिली लस

देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने धुमाकूळ घातला आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढत चालली असून कोरोनाला रोखण्यासाठी निर्बंध लावण्यात आले आहे. तसेच देशभरात लसीकरणाला सुरुवात केली आहे.

१ मेपासून देशभरात १८ वर्षांवरील सर्व नागरीकांना लस देण्यास सुरुवात झाली आहे. अशात सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहे. लसीकरणाचे काही व्हिडिओ पाहून लोकांना हसू आवरत नाहीये. आता असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

व्हिडिओमध्ये एक तरुणी लस घेताना दिसून येत आहे. पण यावेळी ती लस घेताना लस खुप नाटकं करताना दिसून येत आहे. अंकित सेठिया नावाच्या तरुणाने हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. व्हिडिओमध्ये दिसणारी तरुणी त्याचीच बहीण आहे, असे त्याने म्हटले आहे.

दिलेल्य माहितीनुयार, हा व्हिडिओ झारखंडच्या जारमुंडी परीसरातील आहे. लसीकरणाच्या वेळी त्या तरुणीने जाम गोंधळ घातला आहे. त्या तरुणीने नाव नॅन्सी अग्रवाल असे आहे. या व्हिडिओच्या पोस्टमध्ये तिच्या भावाने तिला टॅगही केले आहे.

या व्हिडिओमध्ये नॅन्सी लसीकरणासाठी आली आहे, पण ती खुप घाबरलेली दिसत आहे. तसेच लस घेताना खुप गोंधळ घालत आहे. त्यामुळे तिला लस देण्यासाठी चार पाच आरोग्य कर्मचाऱ्यांनी तिला घेरले आहे आणि तिला बोलण्यात गुंतवून लस दिली आहे.

इंजेक्शनची भिती आहे, पण कोरोनाची लस देखील घेणं गरजेचं आहे. असाच विचार करुन सर्वांनी कोरोनाची लस घेतली पाहिजे, असे त्या तरुणाने व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे. तसेच त्या तरुणाने त्या आरोग्य कर्मचाऱ्यांचे आभारही मानले आहे.

महत्वाच्या बातम्या-

भुख लागली असेल बिनधास्त खा, पैसे देऊ नका; सोशल मीडियावर तमिळनाडुच्या फळविक्रेत्याची चर्चा
कोरोना झाला तरी चालेल पण लस नको, लसीकरणाला घाबरून गावकऱ्यांनी टाकल्या नदीत उड्या
चाहत्यांनी विराट, रोहित आणि धोनीचं एका शब्दात वर्णन करायला सांगितलं; सुर्यकुमारने दिली भन्नाट उत्तरं

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.