होणाऱ्या पतीला व्हिडिओ कॉल करुन तरुणीने घेतला गळफास; धक्कादायक कारण आले समोर

उत्तर प्रदेशच्या गोरखपुर जिल्ह्यातून अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका तरुणीने होणाऱ्या नवऱ्याला व्हिडिओ कॉल करुन लाईव्ह सुसाईड केले आहे. तरुणी आपल्या होणाऱ्या पतीवर नाराज असल्याने तिने पाऊल उचलले असल्याची माहिती मिळत आहे.

ज्यावेळी तरुणीने आत्महत्या केली, त्यावेळी ती तिच्या होणाऱ्या नवऱ्यासोबत बोलत होती. तरुणी आत्महत्या करत असल्याचे तरुणाने पाहिल्यानंतर त्याने तातडीने पोलिस आणि तिच्या घरच्यांना ही माहिती दिली. पण तोपर्यंत तिचा मृत्यु झालेला होता.

महुआपुरमध्ये राहणाऱ्या लालचंद यांच्या मुलीचे लग्न संतकबीर जिल्ह्यातील युवकासोबत ठरले होते. दोघांचे लग्न २९ मे ला होणार होते, पण काही कारणांमुळे त्यांचे लग्न मोडले. पण पुजा फोनच्या माध्यमातून त्या तरुणाच्या संपर्कात होती.

हा तरुण नोएडामध्ये नोकरी करतो. तरुणीने त्याला व्हिडिओ कॉल लावून बोलत असतानाच आत्महत्या केली. जेव्हा तरुणाने पोलिस आणि घरच्यांना सांगितले, तेव्हा घरचे लगेच तिच्या रुमजवळ गेले पण दरवाजा आतून बंद होता. त्यानंतर दरवाजा तोडून तिला खाली उचरवलं पण तोपर्यंत तिचा मृत्यु झाला होता.

याप्रकरणी तरुणीच्या कुटुंबाने कुठलीही तक्रार पोलिस ठाण्यात नोंदवली नाही. हे प्रकरण पाहता तरुणी कुठल्यातरी गोष्टीमुळे नाराज होती, त्यामुळे तिने आत्महत्या केली आहे. पण अद्याप तरुणीने इतके टोकाचे पाऊल का उचलेले हे अजून स्पष्ट झालेले नाही, असे पोलिसांनी म्हटले आहे.

तसेच तरुणीच्या मृतदेहाला शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहे. या प्रकरणाचा तपासही सुरु आहे. पण याप्रकरणी मृत तरुणीच्या वडिलांनी तक्रार नोंदवल्यानंतर कारवाई केली जाणार आहे, असेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

महत्वाच्या बातम्या-

८ वर्षांच्या तुलसीला १२ आंब्याचे मिळाले १ लाख २० हजार रुपये, सोबत मिळाला १ मोबाईल आणि २ वर्षांचे इंटरनेट फ्री
करिश्मा कपूरचा चित्रपट पाहील्यामूळे तिच्या चाहत्याला मिळाली होती शिक्षा; रात्रभर बाहेर झोपावे लागले
आपल्या घरातील लाईटबील जास्त का येते जाणून घ्या अन्यथा असेच लुटले जाल

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.