दारूच्या नशेत तरुणीने पुण्यात भररस्त्यात झोपून, आरडाओरड करुन घातला धिंगाणा, पाहा व्हिडिओ

पुणे । पुणे तिथे काय उणे असे अनेकदा म्हटले जाते. मात्र या मोठ्या शहरात अनेक धक्कादायक प्रकार समोर येत आहेत. आता एका तरुणीने दारूच्या नशेत रोडवर धिंगाणा घातल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. ती तरुणी चक्क रोडवरच झोपली होती. अनेक गाड्यांना ती आडवत होती.

पुण्यातील स्वारगेटच्या दिशेने जाणार्‍या हिराबाग चौकात ही घटना घडली आहे. या घटनेची माहिती तेथील एका स्थानिक व्यक्तीने पोलिसांना कळवताच, पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. आणि या तरुणीला रस्त्याच्या कडेला नेण्यात आले.

स्वारगेटच्या दिशेने जाणाऱ्या टिळक रस्त्यावरील हिराबाग चौकात रात्री साडेदहाच्या सुमारास ही तरुणी मद्यधुंद अवस्थेत गोंधळ घातल होती. यामुळे तिने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. रस्त्यावरुन येणाऱ्या जाणाऱ्यांना गाड्यांचा मार्ग अडवण्याचा प्रयत्न ती करत होती. यामुळे गाडी चालवताना अनेकांना अडचन निर्माण झाली होती.

या तरुणीला पाहण्यासाठी रस्त्याच्या आजूबाजूला चांगलीच गर्दी जमली. यासंदर्भातील माहिती स्थानिकाने पोलीस नियंत्रण कक्षाला दिली. पोलिसांनी तातडीने घटास्थळी येत या मुलीला रस्त्यावरुन बाजूला काढले. मात्र ही तरुणी कोणाचही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती.

पोलिसांनी या तरुणीला अधिक चौकशीसाठी पोलीस स्थानकानकामध्ये नेले. तिची चौकशी करण्यात आली. यामुळे तिची ही व्हिडिओ सध्या सर्वत्र व्हायरल होत आहे. ही एक उच्चशिक्षित तरुणी असल्याची माहिती समोर आली आहे.

ताज्या बातम्या

धक्कादायक! तोकडे कपडे घातल्याचा आरोप करत टवाळखोरांकडून तरुणींचे कपडे फाडण्याचा प्रयत्न

मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांची तळीये गावासाठी ११ लाखांची मदत, इतर आमदार कधी जागे होणार?

धक्कादायक! फेक कॉल केल्यामुळे पोलिसांची तरुणाला मारहाण, तरुणाचा मृत्यू

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.