बॉयफ्रेंडचे निघाले आणखी तीन मुलींसोबत अफेअर; तरुणीने ‘असा’ घेतला बॉयफ्रेंडशी बदला

प्रत्येकाचेच प्रेम शेवटपर्यंत टिकते असे नाही. अनेकदा प्रेमात भांडणं होतात, घरच्यांचा विरोध असतो किंवा मग प्रेयसी प्रियकरच लग्नाला नकार देत असतात, त्यामुळे अनेक विचित्र घटनाही बघायला मिळतात.

आता अमेरिकत राहणाऱ्या एका २० वर्षीय ज्वेलरी मेकर लिव पोर्टिलोने टिकटॉकवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यामध्ये तिने म्हटले आहे, की एका महिलेने तिला एक रिवेंज नेकले तयार करण्याची ऑर्डर दिली आहे. त्या महिलेला ते आपल्या पार्टनरला गिफ्ट करायचे आहे.

संबंधित महिलेच्या बॉयफ्रेंडचे ३ महिलांशी अफेअर सुरु आहे. त्यामुळे त्या महिलेने त्याच्याशी बदला घेण्यासाठी भन्नाट शक्कल लढवली आहे. असे लिवने तिच्या व्हिडिओमध्ये म्हटले आहे.

रिवेंज नेकलेसवर त्या महिलेने आपल्या बॉयफ्रेंडच्या तिन्ही गर्लफ्रेंची नावे आणि रिलेशनशिप ऍनिवर्सरीची तारीख लिहिण्यास सांगितली आहे. अशाप्रकारे ते गिफ्ट घेऊन ती बॉयफ्रेंडचा बदला घेणार आहे.

विशेष म्हणजे त्या महिलेने हे गिफ्टचे बॉयफ्रेंडच्या क्रेडिट कार्डवरुन दिले आहे, असेही लिव पोर्टिलोने तिच्या टिकटॉकच्या व्हिडिओमध्ये दावा करत म्हटले आहे.

तसेच संबंधित महिला ते रिवेंज नेकलेस त्या तरुणाला त्याच्या फॅमिली आणि त्याच्या मित्रांसमोर देणार आहे. ज्यामुळे त्या लोकांसमोर त्या तरुणाचे सत्य बाहेर येईल, असेही लिवने व्हिडिओमध्ये म्हटले आहे.

तसेच संबंधित महिलेने म्हटले होते की मला माझ्या बॉयफ्रेंडने धोका दिला होता त्यामुळे मी त्याच्या गर्लफ्रेंडची नावे लिहून त्याला देणार आहे, असेही लिवने म्हटले आहे. लिवचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

महत्वाच्या बातम्या-

आनंदाची बातमी! SBI चे ग्राहक सेवा केंद्र सुरु करुन तुम्ही पण करु शकता हजारोंची कमाई; जाणून घ्या कसे…
काळ आला होता पण वेळ नाही! नदीत पिकनीकला गेलेले संपुर्ण कुटुंब अडकले पाण्यात, पण…
मुस्लिम मुलीच्या प्रेमात होता हिंदू तरुण मात्र विरोध असल्याने उचललं असं पाऊल की…

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.