अंधश्रद्धेचा कळस! सापाने दंश केल्यानंतर मुलीला नेले बाबाकडे; उपचाराअभावी सोडले प्राण

मुंबई | अनेक ठिकाणी आजही अंधश्रद्धा पाळल्या जात आहे. या अंधश्रद्धा पाळल्याने देशभरात अनेक धक्कादायक गोष्टीही घडत असतात. अशीच एक धक्कादायक घटना जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातील वनकोठे गावात घडली आहे.

वनकोठे गावात राहणाऱ्या आदिवासी कुटुंबातील शारदा रामचंद्र भिल असे या युवतीचे नाव असून घर सावरत असताना तिला सर्पा ने शारदाला दंश केला होता. मात्र, धक्कादायक बाब म्हणजे, शारदाच्या पालकांनी शारदाला उपचारासाठी दवाखान्यात न नेता अमळनेर तालुक्यातील कान्हेरे फाफोरे येथे एका बाबांच्या ठाण्यावर सर्पाचे विष उतरवण्यासाठी नेले.

शारदावर तेथे दिवसभर ठेवल्यानंतर काही उपयोग होत नसल्याचे लक्षात आल्यानंतर पालकांनी तिला परत घरी आणले. मात्र तोपर्यंत वेळ निघून गेली होती. योग्य उपचारांना उशीर झाल्याने शारदाची शुद्ध हरपली होती. गावातील सुज्ञ नागरिकांना माहिती मिळताच त्यांनी शारदाला एरंडोल ग्रामीण रुग्णालयात हलवले मात्र डॉक्टरांनी मृत घोषित केले.

दरम्यान, आजही समाजात अंधश्रद्धेला खत पाणी दिल्या जात आहे, हे दुर्दैव म्हणावे लागेल. मात्र या अशा अंधश्रद्धेमुळे आज एका १७ वर्षीय युवतीला आपला जीव गमवावा लागला आहे. याचबरोबर आजही अशा गोष्टींवर विश्वास ठेवणारा वर्ग आपल्यात असल्याने या घटना मोठ्या प्रमाणात घडताना पाहायला मिळत आहे.

महत्त्वाच्या बातम्या
पहा सैफ- करिनाच्या बाळाची पहिली झलक; सोशल मिडीयावर फोटो होतायेत तुफान व्हायरल
#ArrestRamdev : फसवणूक केल्याच्या आरोपाखाली बाबा रामदेव यांच्या अटकेची मागणी; WHO म्हणते…
खा. डेलकर यांनी मृत्यूपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत अनेक महत्त्वाच्या नावांचा उल्लेख? मृत्यू प्रकरणातलं गूढ वाढलं

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.