तरुणीला वडिलांसाठी हवे होते ऑक्सिजन सिलिंडर; शेजाऱ्याने ठेवली घृणास्पद मागणी

कोरोनाचा प्रसार दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. मृतांची संख्या पण दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. कोरोना मृतदेहांची विटंबना पण काही ठिकाणी चालू असल्याचा धक्कादायक प्रकार आता समोर आला आहे.

सोशल मीडियावर एक प्रकार उघडकीस आला आहे. एका मुलीला तिच्या वडिलांसाठी ऑक्सिजन सिलिंडरची गरज होती तेव्हा ती तिच्या शेजार्यांकडे मदत मागायला गेली. मदत मागायला गेल्यावर शेजाऱ्याने त्याच्यासोबत झोपण्याची जाचक अट त्या मुलीला घातली.

सोशल मीडियावरून हे प्रकरण समोर आले आहे. भवरीन कंधारी ट्विटर अकाऊंटवरून लिहिण्यात आले आहे की, ‘माझ्या मित्राच्या बहिणीला तिच्या वडिलांसाठी ऑक्सिजन सिलिंडरची आवश्यकता होती. तिच्या शेजाऱ्याने तिला सिलिंडरऐवजी त्याच्याबरोबर झोपण्यास सांगितले, यावर काय कारवाई केली जाऊ शकते का?

जेव्हा हे ट्विट व्हायरल झाले तेव्हा लोकांनी निरनिराळ्या प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. कोणी असे म्हटले की त्या शेजाऱ्याचे नाव सार्वजनिक करा म्हणजे त्याला चांगला धडा मिळेल किंवा काहींनी असेही म्हटले आहे की त्याच्या विरोधात पोलीस केस करा.

सोशल मीडियावर पण अशी प्रकरणे पुढे येत आहेत. असेच एक दुसरे प्रकरण पण समोर आले आहे. त्यात एका मुलीने म्हटले आहे की, जेव्हा तिने कोरोना रोगाच्या उपचारासंदर्भात माहिती मिळविण्यासाठी एका नंबरवर कॉल केला तेव्हा पलीकडून उत्तर आले, ‘अहो मॅडम, मी फक्त मुलींना पुरवतो बाकी इतर काहीही नाही.’ यानंतर कॉल डिस्कनेक्ट झाला.

दुसऱ्या प्रकरणातील मुलीने मात्र हरियाणा पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली आहे. तिने पोलिसांना तिच्याबाबतीत काय घडले हे पोलिसांना सांगितले आहे. पोलिसांनी तिचे म्हणणे ऐकून तक्रार दाखल केली आहे.

ताज्या बातम्या
यांचा एक रूपया सुद्धा घेऊ नका, कोवीड सेंटरसाठी अमिताभ बच्चनने दिलेले २ कोटी परत करण्याची मागणी

घर बसल्या आपण आधार कार्ड लॉक करू शकता; त्यासाठी पाठवावा लागेल ‘हा’ एसएमएस

अरे बापरे! लॉकडाऊन काळात अचानक वाढली आरामदायी सोफ्यांची मागणी; कारण वाचून हैराण व्हाल

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.