वडिलांच्या संपत्तीवर मुली केव्हा हक्क दाखवू शकतात; घ्या जाणून 

मुंबई | वडिलांच्या संपत्तीत मुलाप्रमाणेच मुलीला देखील समान वाटा दिला जावा, याबाबतचा महत्त्वपूर्ण निर्णय काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. तसेच हिंदू वारसाहक्क दुरुस्ती कायदा २००५नुसार वडील ह्यात असतील किंवा नसले तरी देखल मुलीला संपत्तीत समान हक्क मिळेल असे सांगण्यात आले आहे.

तसेच वडिलांच्या संपत्तीवर मुली केव्हा हक्क दाखवू शकतात? याचबरोबर नवीन कायद्यानुसार कोणते अधिकार आहे? ९ सप्टेंबर, २००५ नंतर जन्माला आलेल्या मुलींसाठीच फक्त हा कायदा आहे का? त्यापूर्वी जन्माला आलेल्या मुलींच्या वारसाहक्काचे काय? अशा अनेक प्रश्नांची माहिती आज आपण घेणार आहोत.

वडिलोपार्जित मालमत्ता असेल तर…
२००५ मध्ये हिंदू कायद्यात करण्यात आलेल्या दुरुस्तीनंतर वडील त्यांच्या मनमानी अशी मालमत्ता वाटू शकत नाहीत. म्हणजेच वाटणी मध्ये मुलीला सामायिक करण्यास नकार देऊ शकत नाही. आता कायदानुसार मुलगी जन्माला येताच तिला वडिलोपार्जित मालमत्तेचा हक्क मिळतो.

स्वत: कमवलेली मालमत्ता…
वडिलांच्या स्वत: च्या मालकीच्या मालमत्तेवर, मुलींचा हक्क नसतो. कारण जर वडिलांनी जमीन विकत घेतली असेल, तर ते ही मालमत्ता ज्याला पाहिजे त्याला देऊ शकतात. स्वतःच्या इच्छेनुसार कोणालाही त्यांची स्वतःची मालमत्ता देणे हा वडिलांचा कायदेशीर अधिकार आहे.

२००५ नंतर जन्माला आलेल्या मुलींसाठीच फक्त हा कायदा आहे का?…
भारतीय घटनेच्या समानतेच्या तत्त्वाला अनुसरून २००५ नंतर वा त्यापूर्वी जन्माला आलेल्या सर्व हिंदू मुलींचा समान वारसाहक्क या खंडपीठाने मान्य केला. २००५ आधी जन्माला आलेल्या सर्व हिंदू मुलींना हा वारसाहक्क लागू असला तरी २००५ साली जर ही स्त्री जीवित असेल तरच तिला हा हक्क लागू होतो.

मृत्युपत्र लिहिण्यापूर्वी वडिलांचा मृत्यू झाल्यास…
मृत्युपत्र लिहिण्यापूर्वी वडिलांचा मृत्यू झाला तरी प्रत्येक वारसांना मालमत्तेवर समान हक्क असतो. तसेच मुलगी म्हणून आपल्याला आपल्या वडिलांच्या मालमत्तेवर पूर्ण हक्क असतो. यामध्ये विधवा पत्नी , मुली आणि मुले तसेच इतरांचा समावेश असतो.

महत्त्वाच्या बातम्या
“महाराष्ट्र सरकारविरुद्ध भुंकणाऱ्यांना व चिवचिवाट करणाऱ्यांना सरकारी कवचकुंडले”
एक रिक्षाचालक ते रियल इस्टेट किंग, जाणून घ्या कसे बनले अविनाश भोसले करोडोंच्या कंपनीचे मालक
सावधान! अनेक कोरोना रुग्णांमध्ये उद्भवतेय ‘ही’ भयंकर समस्या; मृत्यूचाही धोका

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.