…तरच वडीलांच्या संपत्तीवर मुली हक्क दाखवू शकतात; जाणून घ्या सविस्तर

मुंबई | हिंदू वारसाहक्क दुरुस्ती कायदा २००५नुसार वडील ह्यात असतील किंवा नसले तरी देखल मुलीला संपत्तीत समान हक्क मिळेल असे सांगण्यात आले आहे. वडिलांच्या संपत्तीत मुलाप्रमाणेच मुलीला देखील समान वाटा दिला जावा, याबाबतचा महत्त्वपूर्ण निर्णय काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.

वाचा वडिलांच्या संपत्तीवर मुली केव्हा हक्क दाखवू शकतात?
मृत्युपत्र लिहिण्यापूर्वी वडिलांचा मृत्यू झाल्यास…
मृत्युपत्र लिहिण्यापूर्वी वडिलांचा मृत्यू झाला तरी प्रत्येक वारसांना मालमत्तेवर समान हक्क असतो. तसेच मुलगी म्हणून आपल्याला आपल्या वडिलांच्या मालमत्तेवर पूर्ण हक्क असतो. यामध्ये विधवा पत्नी , मुली आणि मुले तसेच इतरांचा समावेश असतो.

२००५ नंतर जन्माला आलेल्या मुलींसाठीच फक्त हा कायदा आहे का?…
भारतीय घटनेच्या समानतेच्या तत्त्वाला अनुसरून २००५ नंतर वा त्यापूर्वी जन्माला आलेल्या सर्व हिंदू मुलींचा समान वारसाहक्क या खंडपीठाने मान्य केला. २००५ आधी जन्माला आलेल्या सर्व हिंदू मुलींना हा वारसाहक्क लागू असला तरी २००५ साली जर ही स्त्री जीवित असेल तरच तिला हा हक्क लागू होतो.

स्वत: कमवलेली मालमत्ता…
वडिलांच्या स्वत: च्या मालकीच्या मालमत्तेवर, मुलींचा हक्क नसतो. कारण जर वडिलांनी जमीन विकत घेतली असेल, तर ते ही मालमत्ता ज्याला पाहिजे त्याला देऊ शकतात. स्वतःच्या इच्छेनुसार कोणालाही त्यांची स्वतःची मालमत्ता देणे हा वडिलांचा कायदेशीर अधिकार आहे.

वडिलोपार्जित मालमत्ता असेल तर…
२००५ मध्ये हिंदू कायद्यात करण्यात आलेल्या दुरुस्तीनंतर वडील त्यांच्या मनमानी अशी मालमत्ता वाटू शकत नाहीत. म्हणजेच वाटणी मध्ये मुलीला सामायिक करण्यास नकार देऊ शकत नाही. आता कायदानुसार मुलगी जन्माला येताच तिला वडिलोपार्जित मालमत्तेचा हक्क मिळतो.

 

महत्त्वाच्या बातम्या
युजवेंद्र चहलची होणारी पत्नी धनश्रीचा चाबूक डान्स; एकदा हा भन्नाट व्हिडीओ पाहाच
लसीचे वितरण कसे होईल? लस कुठे साठवणार? याबद्दल पुनावालांनी दिली महत्वाची माहिती
‘महाराष्ट्राच्या इतिहासात इतके धमकावणारे मुख्यमंत्री पाहिले नाहीत’

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.