गिरीश महाजन बायकांच्या मागे फिरतो आणि फक्त पोरींचे फोन उचलतो – एकनाथ खडसे

जळगाव । राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे आणि भाजप नेते गिरीश महाजन यांचे राजकीय वैर सर्वांना परिचित आहे. काही महिन्यांपूर्वी एकनाथ खडसे यांनी भाजपला रामराम करत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी त्यांनी भाजप नेत्यांवर जोरदार टीका केली आहे.

यामुळे त्याच्यात अनेकदा शाब्दिक चकमक होत असते. आता सध्या एकनाथ खडसे यांची एक फोन रेकॉर्डिंग व्हायरल होत आहे. यामध्ये जामनेर तालुक्यातील वडगाव बुद्रुकचा एक तरुण पाणी नसल्याने एकनाथ खडसे यांना फोन करून तक्रार करताना दिसत आहे.

यावर तरुणाला उत्तर देताना एकनाथ खडसे म्हणाले ‘जामनेरचा आमदार कुठे मेला?’ तसेच पुढे त्या मुलाने आमदार साहेब फोन उचलत नसल्याचे सांगितल्यानंतर एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजन फक्त बायकांच्या मागे फिरतो, पोरींचे फोन उचलतो, अशा प्रकारचा टोला लगावला आहे.

ही क्लिप व्हायरल झाल्यानंतर त्यांना पत्रकारांनी विचारले असता खडसे देखील हा आवाज माझाच असल्याचे सांगू लागले. यामुळे आता हे प्रकरण चिघळण्याची शक्यता आहे. सोशल मीडियावर ही क्लिप मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

या प्रकरणामुळे आता पून्हा एकदा गिरीश महाजन विरुद्ध एकनाथ खडसे असा वाद पेटण्याची शक्यता आहे. गिरीश महाजन हे पश्चिम बंगालमध्ये निवडणूकीच्या प्रचारात व्यस्त आहेत.

तालुक्यात पाणी नाही आणि आमदार दुसऱ्या राज्यात प्रचाराला फिरतोय, असाही उल्लेख एकनाथ खडसे यांनी केला. भाजपने गिरीश महाजन यांना ताकद दिल्याने अनेकदा खडसे आपली खदखद बोलून दाखवली होती.

ताज्या बातम्या

‘तुकाराम मुंढेंसारखा खमक्या अधिकारी असल्याशिवाय अधिकारी सुधारणार नाहीत’

लोकं मरायला लागलेत, अन् एसीमध्ये बसून नाटकं करता का? पुण्यात मनसे नगरसेवक अधिकाऱ्यांवर भडकला

मोठी बातमी! राज्यातील १८ ते ४४ वयोगटातील सर्व नागरीकांना मिळणार मोफत कोरोना लस

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.