‘खडसे साहेब! माझ्या मतदारसंघात लक्ष घालण्यापेक्षा स्वत:च्या पराभवाचं आत्मपरीक्षण करा’

मुंबई | अनेक वर्षे भाजपचे काम केल्यानंतर एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांनी फक्त प्रवेश न करता अनेक कार्यकर्ते आणि नेते यांना सोबत घेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मजबूत करत आहेत. खडसे यांच्या जाण्याने भाजपमध्ये पोकळी निर्माण झाली आहे.

याचबरोबर भाजपचे नेते गिरीश महाजन यांच्या बालेकिल्ल्याला देखील हादरा बसला आहे.  महाजनांच्या मतदारसंघातील दोन बसेस भरून जवळपास २५० कार्यकर्ते राष्ट्रवादीमध्ये दाखल झाले आहे. भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते यांचे राष्ट्रवादीमध्ये इन्कमिंग सुरू झाले आहे.

याच पार्श्वभूमीवर गिरीश महाजन यांनी खडसे यांच्यावर पलटवार केला आहे. ‘एकनाथ खडसे यांनी माझ्या जामनेर मतदारसंघात लक्ष घालण्यापेक्षा स्वत:च्या मतदारसंघात लक्ष घालावे. आपण का हरलो, याचे आत्मपरीक्षण करावे, असा सल्ला महाजन यांनी खडसे यांना दिला आहे.

दरम्यान, जामनेरमधील शेकडो कार्यकर्त्यांनी मुक्ताईनगर येथे एकनाथ खडसे, जिल्हा बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे खेवलकर, व राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र भैय्या पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.त्यामुळे भाजपला हा मोठा धक्का मानला जात आहे.

‘आता मी भाजपला माझी ताकद दाखवून देतो’
‘आता मी भाजपला ताकद दाखवून देतो. उत्तर महाराष्ट्रात आता फक्त राष्ट्रवादी काँग्रेसच असेल,’ असे खडसे यांनी म्हंटले आहे. याचबरोबर जळगावात भाजपचे अनेक कार्यकर्ते पक्षाच्या कार्यपद्धतीवर नाराज असल्याचे देखील खडसे यांनी सांगितले आहे.

 

महत्त्वाच्या बातम्या

तुम्हाला माहीत आहे का? शाहरूख खानची चंद्रावर जमीन आहे जी त्याला गिफ्ट म्हणून मिळाली आहे..
राज्यपाल नियुक्त आमदारांची यादी फायनल तयार; उर्मिला मातोंडकरांना डच्चू
भाजपला खिंडार! खडसेंची भाजपवर पहिली ‘सर्जिकल स्ट्राईक’, ६० जण राष्ट्रवादीत दाखल

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.