‘ईडी’च्या नोटिसा पाहून एकनाथ खडसेंना कोरोना होतो, पण माझं तसं नाही’

मुंबई : गेल्या अनेक वर्षांपासूनची भाजपची सत्ता असलेल्या जळगाव महानगरपालिकेवर शिवसेनेला यश मिळाले आहे. या यशाबद्दल सांगताना राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी भाजपा नेते गिरीश महाजन यांच्यावर जोरदार टीका केली होती. आणि त्याच दरम्यान महाजन यांना कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त होते.

याच पार्श्वभूमीवर खडसे म्हणाले होते, ‘गिरीश महाजन हे नियमित व्यायाम करून फिट राहतात. महाजन यांना झालेला करोना खरा आहे की, जळगाव महापालिकेतील भाजपची सत्ता गेल्याचा हा कोरोना आहे. याचा तपास केला पाहिजे, असे खडसे म्हणाले होते.

यावरून कोरोनामुक्त झालेल्या गिरीश महाजन यांनी खडसेंवर जोरदार पलटवार केला आहे. ‘मला करोना होतो, तो ‘ईडी’च्या तारखा पाहून होत नाही. सन्मानीय नेते एकनाथ खडसे यांना ‘ईडी’ची तारीख आली की, लगेच कोरोना होतो,’ असे म्हणत त्यांनी खडसे यांच्यावर निशाणा साधला.

तसेच पुढे बोलताना महाजन म्हणाले, ‘आम्ही खोटी सर्टफिकेट्स जोडून मुंबईतील हॉस्पिटलला जात नाही. घरी क्वारंटाइन सांगून मुंबईत फिरत नाही, असा हल्लाबोल महाजन यांनी एकनाथ खडसे यांच्यावर केला.

दरम्यान, कोरोनाची लागण झाल्याचे समजताच गेल्या दहा दिवसांपासून गिरीश महाजन यांच्यावर उपचार सुरू होते. महाजनांनी नुकत्याच केलेल्या कोरोना चाचणीचा रिपोर्ट निगेटिव्ह आला.

महत्त्वाच्या बातम्या 

रस्त्याने जाणाऱ्या व्यक्तीवर वळूचा हल्ला, वळूने १० फुट हवेत फेकलं आणि…, पहा व्हिडीओ

…म्हणून आमचा लॉकडाऊनला विरोध; कॉंग्रेसच्या बड्या नेत्याने मुख्यमंत्री ठाकरेंचे टोचले कान

एवढ्या वर्षांनंतर पद्मिनी कोल्हापूरेने केला खुलासा; ‘या’ कारणामुळे हिट चित्रपटाला दिला होता नकार

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.