पुणे, २९ मार्च : पुण्यातील भाजप नेते खासदार गिरीश बापट यांचे आज पुण्यात निधन झाले. शहरातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 72 वर्षांचे होते. खासदार गिरीश बापट यांच्या निधनाची माहिती भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मल्लिक यांनी दिली आहे.
बापट गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. दरम्यान, गिरीश बापट यांच्या पश्चात एक मुलगा आणि पत्नी असा परिवार आहे. गिरीश बापट दीड वर्षापासून रुग्णालयात होते, त्यांचे आज निधन झाले. गिरीश बापट यांच्या पार्थिवावर सायंकाळी ७ वाजता वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत.
पुण्याच्या कसबा पेठ विधानसभा मतदारसंघात किंगमेकर म्हणून प्रसिद्ध असलेले गिरीश बापट यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीत संघ स्वयंसेवक, कामगार नेते, नगरसेवक, आमदार, खासदार अशा अनेक जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. तसेच बापट हे पुणे शहराचे विद्यमान खासदार होते. गिरीश बापट यांचे पक्षातील सर्वच नेत्यांशी चांगले संबंध असून ते निवडणुकीच्या राजकारणात जाणकार होते.
गिरीश बापट हे भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांपैकी एक असून गेल्या अनेक वर्षांपासून पुण्याच्या राजकारणावर त्यांचा दबदबा आहे. मात्र, गेल्या काही वर्षांपासून गिरीश बापट गंभीर आजारामुळे राजकारणापासून दूर होते. त्यांचा लोकसभा मतदारसंघातील कार्यकाळ जवळपास संपत आला होता.
मात्र, नुकत्याच झालेल्या कसबा पेठ पोटनिवडणुकीत भाजप पक्ष अडचणीत असताना गिरीश बापट यांनी आजारपणाला बगल देत कार्यकर्त्यांच्या सभांना हजेरी लावली. या सभेला येतानाही गिरीश बापट यांच्या नाकात नळी आणि सोबत ऑक्सिजन सिलेंडर होता.
अशा परिस्थितीतही गिरीश बापट यांनी भाजप कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करून प्रेरित करण्याचा प्रयत्न केला. या सभेत बोलत असताना गिरीश बापट यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. मात्र, इच्छाशक्तीच्या जोरावर गिरीश बापट यांनी सभा गाजवली.
या बैठकीनंतरही गिरीश बापट यांची प्रकृती थोडी खालावली असल्याची चर्चा होती. बापट इतके आजारी असतानाही त्यांना प्रचाराच्या मैदानात आणल्याबद्दल अनेकांनी त्यांच्यावर टीका केली होती. कसबा पोटनिवडणुकीदरम्यान भाजपचे केंद्रीय मंत्री अमित शहा पुण्यातील गिरीश बापट यांच्या घरी गेले.
यावेळी अमित शहा आणि गिरीश बापट यांच्यात चर्चा झाली. या भेटीत दोन्ही नेत्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. मुक्ता टिळकांच्या आधी गिरीश बापट यांनी कसबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार म्हणून जवळपास 30 वर्षे या मतदारसंघाचे नेतृत्व केले आहे.
गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरू होते. तब्येत बरी नसतानाही ते व्हीलचेअरवर बसून पुण्यातील कसबा पोटनिवडणूकीत प्रचारासाठी मैदानात आले. त्याची प्रकृती गंभीर होती. त्यांना लाईफ सपोर्ट सिस्टीमवर ठेवण्यात आले होते.
गेल्या काही दिवसांपासून गिरीश बापट यांची प्रकृती खालावली होती. त्यांच्यावर घरी उपचार सुरू होते. मात्र बुधवारी त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती चिंताजनक असल्यामुळे त्यांच्यावर सध्या आयसीयूमध्ये उपचार सुरू होते.