पठ्ठ्याने चांगल्या नोकरीला मारली लाथ;  पेरूची शेती करून यशाला घातली गवसणी

मुंबई | असं म्हणतात की, एखादी गोष्ट जिद्दीने करायची म्हणलं तर या जगात काहीच अशक्य नाहीये. आज आम्ही तुम्हाला अशाच एका तरुण शेतकऱ्याची कहाणी सांगणार आहे. सांगलीच्या ३४ वर्षीय शितल सूर्यवंशी यांनी सांगली सारखा ऊस पट्ट्यात पेरूची शेती करत भरघोस उत्पन्न घेऊन दाखविले आहे.

२००९ मध्ये शितल सूर्यवंशी यांचे शिक्षण पूर्ण झाले. शितल यांनी जवळजवळ पाच वर्ष एका खासगी कंपनीत काम केले. मात्र कार्पोरेट क्षेत्रातली चांगली नोकरी सोडून पेरू शेती करण्याची हिंमत शितलने केली आणि स्वतःचे वेगळेपण सिद्ध करून दाखवले. २०१५ मध्ये चांगली नोकरी सोडून शेती करण्याचा निर्णय घेतला.

पहिल्याच वर्षी शितल यांना दहा टन पेरूचं उत्पन्न झाले. या उत्पन्नातून त्यांना पहिल्याच वर्षी तीन लाख रुपये मिळाले. या सर्व खर्च वजा जाता एकूण १४ महिन्यात एक ते तीन लाखांचा नफा मिळवला.

दरम्यान, याबाबत बोलताना शितल सूर्यवंशी म्हणतात, ‘एक एकर जमिनीवर पेरूची लागवड करण्यासाठी किमान २ हजार झाडे लागतात. हे सगळ्या झाडांना सेंद्रिय खतांचा वापर केल्यास चांगल्या प्रकारच्या आर्थिक उत्पन्न मिळून आर्थिक स्थैर्य प्राप्त होते.’

महत्त्वाच्या बातम्या
अजित पवारांचे संकेत; कोरोना फोफावतोय, कठोर निर्णय घ्यावे लागतील
रामदास आठवलेंनी दत्तक घेतला बिबट्या; बिबट्याला दिलेल्या नावाची होत आहे सर्वत्र चर्चा
दिवंगत अभिनेता चिरंजीवीच्या मुलाला पाहिलेत का?, व्हिडीओ पाहून चाहते झाले भावुक

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.