१२ आणि ३३० रूपये भरून मिळवा दोन लाख; मोदी सरकारची गरिबांसाठी विमा योजना

नवी दिल्ली | घरच्या मुख्य व्यक्तीवर कुटूंबाची जबाबदारी असते. पण अचानक काही घटना घडली आणि घरच्या कमावत्या पुरूषाचा मृ.त्यू झाला तर उपयोगी ठरतो तो जीवन विमा. हा विमा जर काढला असेल तर व्यक्तीच्या कूटुंबााला पैसे मिळतात. त्यामुळे सर्वांनी विमा काढणे आवश्यक आहे. पण हा विमाच काढला नाही तर त्याचा परिणाम कुटूंबावर होतो.

केंद्र सरकारनं देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली विमा योजना राबवल्या आहेत. ज्याचा हप्ता ही सर्वसामान्यांच्या खिशाला परवडण्यासारखा आहे. त्यामुळे हातावर पोट असणाऱ्या लोकांनाही ही योजना परवडण्यासारखी आहे. त्यामुळे कोणीही या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घेऊ शकतो.

पहिली आहे ती म्हणजे पंतप्रधान जीवनज्योती विमा योजना यामध्ये फक्त वर्षातून एकदाच ३३० रूपयांचा हप्ता भरायचा आणि विमा काढलेल्या व्यक्तीच्या मृ.त्यूनंतर किंवा विम्याची मूदत संपल्यानंतर दोन लाख रूपये मिळतात. ज्यांचे वय १८ ते ५० च्यामध्ये आहे अशी व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकते. विमाधारकाचा जर अपघाती मृ.त्यू झाला तर लगेच पैसे मिळतील पण जर दूसऱ्या कोणत्याही कारणाने मृ.त्यू झाला तर त्याच्या कूटूंबाला पैसे मिळण्यासाठी ४५ दिवसाची वाट पाहावी लागणार आहे.

दूसरी योजना आहे ती म्हणजे पंतप्रधान सूरक्षा योजना यामध्ये घरातील कमावत्या व्यक्तीचा मृ.त्यू झाला तर त्याच्या कुटूंबाला पैसे मिळू शकतात. या योजनेत फक्त १२ रूपये भरून व्यक्तीचा अपघाती मृ.त्यू झाल्यास दोन लाख रूपये भेटतात. यामध्ये वयाच्या ७० वर्षापर्यंत योजनेचा लाभ मिळू शकतो.

महत्वाच्या बातम्या-
आता शेतकऱ्यांना मिळणार ३००० रुपये प्रतिमहिना पेन्शन, ‘या’ सरकारी योजनेचा मोफत लाभ मिळवा
भाजपला दणका! अविनाश जाधव यांच्या पुढाकाराने राम कदम समर्थकांचा मनसेत प्रवेश
फक्त १२ रुपये भरा आणि मिळवा दोन लाख; मोदी सरकारची भन्नाट विमा योजना

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.