Share

Georgia Meloni Wishes On PM Modi Birthday : ताकद, जिद्द आणि लाखोंना दिशा देण्याची क्षमता प्रेरणादायी; सेल्फी टाकत जॉर्जिया मेलोनी यांच्या मोदींना खास शुभेच्छा

Georgia Meloni Wishes On PM Modi Birthday : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त जगभरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. त्यात इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी (Giorgia Meloni) यांनी दिलेल्या शुभेच्छा विशेष ठरल्या आहेत. त्यांनी मोदींसोबतचा एक सेल्फी शेअर करत, त्यांची ताकद, निर्धार आणि लाखोंच्या जनतेचं नेतृत्व करण्याची क्षमता प्रेरणादायी असल्याचं म्हटलं आहे.

मेलोनींच्या शुभेच्छांमध्ये काय खास?

इटलीच्या पंतप्रधानांनी आपल्या शुभेच्छांमध्ये स्पष्टपणे नमूद केलं की, मोदींची ताकद आणि कार्यक्षमता जगाला आदर्शवत वाटते. त्यांनी पुढे असंही म्हटलं की, मैत्री आणि परस्पर सन्मानाच्या भावनेनं भारत-इटलीचे संबंध अधिक दृढ व्हावेत. मेलोनींनी मोदींना उत्तम आरोग्य आणि दीर्घ कार्यकाळाच्या शुभेच्छा दिल्या.

मोदींवर देश-विदेशातून शुभेच्छांचा वर्षाव

मोदींच्या वाढदिवसानिमित्त देशभरात भाजपकडून विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. मध्यप्रदेशात मोदींनी “स्वस्थ नारी, सशक्त परिवार” आणि “राष्ट्रीय पोषण महिना” या योजनांसह अनेक विकासकामांचं लोकार्पण केलं. उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांनी मोदींना “भारताला देवाने दिलेला अवतार” असं संबोधत, स्वातंत्र्याच्या शताब्दीपर्यंत त्यांनी देशाचं नेतृत्व करावं अशी इच्छा व्यक्त केली. दरम्यान, सुप्रसिद्ध वाळू कलाकार सुदर्शन पटनायक (Sudarsan Pattnaik) यांनी 750 कमळांच्या माध्यमातून वाळूवर भव्य कलाकृती साकारून मोदींना शुभेच्छा दिल्या.

मोदींचं जीवनप्रवास

मोदींचा जन्म 17 सप्टेंबर 1950 रोजी गुजरातमधील मेहसाणा (Mehsana, Gujarat) येथे एका साध्या कुटुंबात झाला. ते लहानपणापासूनच कष्टाळू आणि निर्धाराने काम करणारे होते. सन 2001 ते 2014 या काळात त्यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिलं आणि राज्यात आर्थिक व प्रशासकीय सुधारणा घडवून आणल्या. 2014 मध्ये पहिल्यांदा ते भारताचे पंतप्रधान झाले आणि सध्या तिसऱ्या कार्यकाळात देशाचं नेतृत्व करत आहेत. मोदी आज जगातील सर्वात प्रभावशाली नेत्यांपैकी एक मानले जातात.

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now