Share

महाराष्ट्राचे सुपुत्र जनरल मनोज पांडे यांची लष्करप्रमुख पदी निवड, वाचा त्यांची धडाकेबाज कारकीर्द

भारतीय सैन्यदलाचे नवे लष्करप्रमुख म्हणून महाराष्ट्राचे सुपुत्र जनरल मनोज पांडे यांची निवड करण्यात आली आहे. जनरल मनोज पांडे हे मूळचे नागपूरचे आहेत. जनरल मनोज पांडे(Manoj Pandey) हे पुण्यातील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे माजी विद्यार्थी देखील आहेत. १ मे रोजी जनरल मनोज पांडे लष्करप्रमुख पदाची सूत्रे हाती घेणार आहेत.(General Manoj Pandey elected as Chief of Army Staff)

जनरल मनोज पांडे हे लष्करप्रमुख पदावर विराजमान होणारे चौथे मराठी अधिकारी आहेत. यापूर्वी जनरल गोपाळ गुरुनाथ बेवूर,अरुणकुमार वैद्य आणि जनरल मनोज नरवणे हे मराठी अधिकारी लष्करप्रमुख झाले होते. विद्यमान लष्करप्रमुख मनोज नरवणे २८ महिने या पदावर होते. १ मे रोजी विद्यमान लष्करप्रमुख मनोज नरवणे निवृत्त होत आहेत.

त्यानंतर जनरल मनोज पांडे यांची लष्करप्रमुख पदावर निवड करण्यात आली आहे. त्यामुळे सलग दुसऱ्यांदा मराठी अधिकाऱ्याला लष्करप्रमुख पदाचा मान मिळणार आहे. पुण्यातील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर १९८२ मध्ये मनोज पांडे ‘कोअर ऑफ इंजिनियर्स’ मध्ये नियुक्त झाले होते.

जनरल मनोज पांडे यांनी ‘ऑपरेशन पराक्रम’ मध्ये इंजिनिअर रेजिमेंटचे नेतृत्व केले होते.याशिवाय जनरल मनोज पांडे यांनी इंजिनिअर ब्रिगेड, सीमेवरील इन्फ्रंट्री ब्रिगेड आणि लडाख सीमेवरील माउंटन डिव्हिजनचे नेतृत्व केले होते. जनरल मनोज पांडे यापूर्वी अंदमान-निकोबार कमांडचे प्रमुख देखील राहिले आहेत.

शालेय जीवनातच मनोज पांडे यांनी लष्करात जाण्याचे स्वप्न पहिले होते. सैन्यात जाण्यासाठी मनोज पांडे अथक परिश्रम घेतले होते. शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मनोज पांडे यांनी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए) ची परीक्षा दिली होती. या परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांना एनडीएत प्रवेश मिळाला होता.

जनरल मनोज पांडे यापूर्वी लष्कराचे उपप्रमुख होते. लष्करातील सर्वात ज्येष्ठ अधिकारी असल्याने त्यांची लष्करप्रमुख करण्यात आली आहे. १ मे पासून जनरल मनोज पांडे लष्करप्रमुख पदाचा पदभार स्वीकारणार आहेत. लष्करप्रमुख पदावर निवड झाल्यानंतर अनेकांनी जनरल मनोज पांडे यांचे अभिनंदन केले आहे.

महत्वाच्या बातम्या :-
‘या’ कंपनीच्या गुंतवणूकदारांना मोठा झटका, ९ टक्क्यांनी शेअर कोसळल्यानंतर हजारो कोटींचे नुकसान
बाळासाहेब ठाकरे आणि मराठीवर खरंच प्रेम असेल तर…; सुप्रिया सुळेंचा राज ठाकरेंना टोला
बहिणीच्या निधनानंतर भावूक झाला ‘हा’ आयपीएल खेळाडू, म्हणाला, ‘मला नेहमी तुझी आठवण येत राहील’

ताज्या बातम्या इतर

Join WhatsApp

Join Now