स्केटिंग करताना जेनेलिया वहिनी धडपडली, हाताला दुखापत झाली तरी ‘पावरी’ सुरूच; पहा व्हिडीओ

मुंबई | बॉलिवूडच क्यूट कपल अभिनेता रितेश देशमुख आणि पत्नी अभिनेत्री जेनेलिया डिसूजा हे दोघेही सोशल मिडीयावर चांगलेच सक्रीय असतात. त्यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडीओला नेहमीच चाहत्यांची पसंती मिळते. परंतु यावेळी जेनेलियाने शेअर केलेल्या व्हिडीओमुळे चाहत्यांनी जेनेलियासाठी चिंता व्यक्त केली आहे.

त्याचं झाल असं की, जेनेलियाने तिच्या इन्स्टाग्रामवर अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये ती स्केटिंग करताना दिसत आहे. परंतु स्केटिंग करताना ती तोल जाऊन जोरात खाली पडते.

व्हिडीओ पाहाताना जेनेलिया खाली पडल्यामुळे तिला झालेला त्रास सहज अनुभवता येतो. याशिवाय व्हिडीओत जेनेलियाच्या हाताला दुखापत झाल्याचे दिसते. यामुळे चाहत्यांनी तिच्यासाठी चिंता व्यक्त केली आहे.

जेनेलियाने या सर्व घटनेचा भन्नाट व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ सध्या ट्रेंडमध्ये असलेल्या पावरी स्टाइलने बनवला आहे. जेनेलियाने “माझी रिकव्हरी पावरी स्टोरी” असं कॅप्शन दिले आहे. आणि यासोबत घडलेला सर्व प्रकार सांगितला आहे.

जेनेलिया कॅप्शनमध्ये लिहिते, काही दिवसांपुर्वी मी स्केटिंग शिकण्याचे ठरवले. जेणे करून मी जास्त प्रेरणादायी बनू शकते. शिवाय माझ्या मुलांना चांगली कंपनी मिळेल. मला वाटल मी स्केटींग शिकल्यानंतर एक कूल व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केरेन. पण नंतर मला वाटल की हाच व्हिडीओ शेअर करेन. कारण इन्स्टावर सर्वच सक्सेस स्टोरी पोस्ट करतात. मात्र जेव्हा आपण पडतो तेव्हाच काय?. यानिमित्ताने सतत प्रयत्न करत राहण्याचा संदेश जेनेलियाने देत महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या-
‘पैसा ये पैसा…’ गाण्यावर रितेश जेनेलियाची पूल पार्टी, पहा दोघांचा भन्नाट डान्स
‘पावरी हो रही है’ स्टाईलमध्ये रितेशने शेअर केला व्हिडीओ; सोशल मिडीयावर घालतोय धुमाकूळ
आश्चर्यंम! बहाद्दरानं जुन्या साडीपासून २ मनिटात बनवली दोरी, व्हिडीओ पाहून थक्क व्हाल

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.