जेनेलिया आणि रितेश देशमुखने घेतला अवयवदानाचा निर्णय; व्हिडिओ शेअर करत दिली माहिती

 

मुंबई | बॉलिवूड कलाकार रितेश देशमुख आणि त्याची पत्नी जेनेलिया यांनी आपण अवयवदान करणार असल्याची माहिती एक व्हिडिओ शेअर करत दिलीे आहे.

रितेश देशमुख आणि जेनेलिया सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमीच आपल्या चाहत्यांच्या संपर्कात असतात. डॉक्टर्स डे च्या निमित्ताने त्यांनी अवयव दान करत असल्याचे व्हिडिओच्या माध्यमातून सांगितले.

अनेक दिवसांपासून अवयवदानाचा विचार सुरू होता पण तो तुमच्या समोर आज मांडता आला असे या व्हिडिओ मधून रितेश आणि जेनेलिया यांनी सांगितले आहे.

रितेश आणि जेनेलियाने व्हिडिओतून आपल्या चाहत्यांनाही अवयव दान करण्याचे आवाहन केले आहे. या दोघांनी घेतलेल्या निर्णयाचे त्यांच्या चाहत्यांकडून कौतुक करण्यात येत आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.