देशमुख फॅमिलीचा होळीचा हा भन्नाट व्हिडीओ तुम्ही पाहिला का? पाहून तुम्हीही म्हणाल, मस्त!

होळीच्या निमित्ताने बॉलिवूड अभिनेत्री जेनेलिया देशमुखने आपल्या पतीसोबत एक खुपच रॉमेन्टिक होळीचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये रितेश आणि जेनेलिया एकमेकांना रंग लावताना दिसत आहेत.

सोशल मिडीयावर हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. बॉलिवूडच्या अनेक कलाकारांनी हा व्हिडीओ पाहून दोघांना होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. जेनेलिया आणि रितेशला सोशल मिडीयावरून खुप पसंती मिळत असते.

ते दोघे नेहमी सोशल मिडीयावर ऍक्टीव्ह असतात. व्हिडीओमध्ये दिसत आहे की कशाप्रकारे जेनेलिया रितेशला रंग लावत आहे आणि रितेशला याचा रागही येत आहे. त्यानंतर रितेश जेनेलियाच्या पुर्ण चेहऱ्यावर रंग लावतो.

या व्हिडीओला त्यांच्या चाहत्यांनी खुप पसंत केले आहे. रितेशनेही आपल्या इन्स्टाग्रामवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये रितेश, जेनेलिया आणि त्यांची मुले होळीच्या रंगात रंगलेले दिसत आहेत. सगळे मिळून एकसाथ होळीच्या शुभेच्छा देताना दिसत आहेत.

या व्हिडीओमध्ये सगळेजण मस्ती करताना दिसत आहेत. सगळे खुप आनंदी दिसत आहेत. या व्हिडीओला चाहत्यांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. दरम्यान, ही पहिलीच वेळ नाहीये की जेनेलिया आणि रितेश सोशल मिडीयावर धुमाकूळ घालत आहेत. ते नेहमी कोणत्या ना कोणत्या व्हिडीओमुळे चर्चेत असतात.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.