गेहना वशिष्ठ टॉपलेस फोटोमुळे झाली ट्रोल, चाहते म्हणाले, राज कुंद्राचे शूट होते का?

मुंबई । नुकतेच गेहना वशिष्ठने टॉपलेस फोटो शेअर केले आहेत. यामुळे ती चर्चेत आली आहे. असे असताना तिचे फोटो सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत. यासोबतच तिने पोस्ट शेअर करून स्वत:ला निर्दोष सिद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे. अश्लील चित्रपट बनवण्याच्या आणि प्रसारित करण्याच्या आरोप तिच्यावर झाले आहेत.

आता गेहना वशिष्ठाने सोशल मीडियावर बोल्ड फोटो शेअर केले आहेत. यामुळे ती अजूनच चर्चेत आली आहे. ती म्हणाली की, जेव्हा हयात रिजन्सीमध्ये असे फोटो क्लिक केले गेले, तेव्हा आम्ही तेथे सुमारे २० लोकांसोबत होतो. यामुळे कोणताही लैंगिक शोषण तिथे नव्हते.

तेथे ना मी दारू प्यायले आणि ना मी ज्यूस प्यायले. मी पूर्णपणे जागरूक होते. असेही तिने म्हटले आहे. मी एका ऑटोमध्ये सेटवर गेले आणि दुसऱ्या ऑटोमध्ये सुखरूप परत आले, असेही तिने म्हटले आहे. त्यासाठी मला पैसेही मिळाले. असेही ती म्हणाली.

तसेच सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मी १८ वर्षांच्यावर आहे आणि एक कलाकार आहे. मात्र यावरून तिला ट्रोल देखील करण्यात आले आहे. पॉर्न व्हिडिओ प्रकरणी राज कुंद्रा सध्या अटकेत आहे. त्याने अनेक तरुणींना या जाळ्यात देखील आणल्याचे बोलले जात आहे.

यामुळे गेहनाच्या या पोस्टवर राज कुंद्राचे नाव घेऊन नेटकऱ्यांनी खूप मजा घेतली आहे. गेहनाच्या फोटोवर कमेंट करताना एका युजरने लिहिले, राज कुंद्राचे शूटिंग चालू आहे का?, असे म्हणत तिचा ट्रोल करण्यात आले आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.