Share

असे शूट झाले ‘गेहराईंया’ चित्रपटातील इंटिमेट सीन्स, पहिल्यांदाच करण्यात आला ‘हा’ प्रयोग

gehraiyaan movie

अनेकदा चित्रपटांमध्ये मानवी भावनांमधील गुंतागुंत दाखवण्यासाठी इंटिमेट सीनचा आधार घेतला जातो. अशी जवळीक असलेली दृश्ये साकारण्यासाठी हॉलिवूड चित्रपटांमध्ये इंटिमसी दिग्दर्शकाची मदत घेतली जाते. ‘गेहराईंया ‘ या हिंदी चित्रपटात पहिल्यांदाच असा प्रयोग करण्यात आला आहे. या चित्रपटातील काही इंटिमेट सीन इंटिमसी दिग्दर्शकाने शूट केले आहेत.(geharayian film intimate scene shoot)

‘गेहराईंया'(Gehariyaan) चित्रपटाच्या इंटिमसी दिग्दर्शकाचे नाव दार गई(Dar Gai) असे आहे. या चित्रपटात अभिनेत्री दीपिका पदुकोनची मुख्य भूमिका आहे. या चित्रपटात अभिनेता सिद्धांत चतुर्वेदी(Sidhant Chaturvedi) आणि अभिनेत्री अनन्या पांडे यांनी देखील अभिनय केला आहे. ‘गेहराईंया’ चित्रपटात अभिनेत्री दीपिका पदुकोन आणि अभिनेता सिद्धांत चतुर्वेदी यांच्यामध्ये काही इंटिमेट सीन आहेत. या इंटिमेट सीन्सची सध्या बरीच चर्चा होत आहे.

हिंदी चित्रपटसृष्टीत अशी दृश्ये क्वचितच पाहायला मिळाली असतील. चित्रपटाच्या दिग्दर्शकांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. ‘गेहराईंया’ चित्रपटातील इंटिमेट सीन सहजतेने शूट करण्यासाठी एक खास कल्पना मांडण्यात आली होती. या चित्रपटातील इंटिमेट सीन इंटिमसी दिग्दर्शकाच्या साहाय्याने शूट करण्यात आले होते.

इंटिमसी दिग्दर्शक चित्रपट सुरु होण्यापूर्वी त्यातील जवळीक असणाऱ्या दृश्यांसाठी कार्यशाळा घेतो. या कार्यशाळेची आखणी अभिनेत्री आणि अभिनेता इंटिमेट सीन्स शूट करताना आरामदायक राहतील, त्यांच्यावर कोणताही ताण येणार नाही यासाठी केली जाते. जर कलाकाराला एखादी गोष्ट करायची नसेल तर त्यांच्यावर जबरदस्ती केली जात नाही.

चित्रपटांमध्ये साहसी दृश्ये चित्रित करताना जशी ऍक्शन दिग्दर्शकाची गरज असते. त्याचप्रमाणे चित्रपटांमध्ये इंटिमेट सीन्स शूट करण्यासाठी इंटिमसी दिग्दर्शकाची गरज असते. इंटिमसी दिग्दर्शक कलाकारांकडून असे सीन सहजरित्या शूट करून घेतो. बोल्ड दृश्ये देताना कलाकारांना मानसिक आणि भावनिकदृष्ट्या सुरक्षित वाटावं, यासाठी इंटिमसी दिग्दर्शकाही गरज असते, असे मत इंटिमसी दिग्दर्शक दार गई याने व्यक्त केले आहे.

कार्यशाळेमधून कलाकारांचे मन आणि शरीर आरामदायी होते. त्यांनी त्यांचा सफाई झोन तयार केला की त्याचा पार्टनर त्याच्या आणखी जवळ जाऊ शकतो, असे मत ‘गेहराईंया’ चित्रपटाचे इंटिमसी दिग्दर्शक दार गई यांनी व्यक्त केलं आहे. इंटिमसी दिग्दर्शकाचे काम फक्त टेक्निकल नाही तर मानसशास्त्राशी संबंधित आहे, असे दार गई यांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या :-
VIDEO: युक्रेनच्या सायकलस्वारावर पडला तोफेचा गोळा, रशियाचा क्रूर चेहरा आला जगासमोर
पाणी भरू आल्यानंतर नवऱ्याला ‘त्या’ अवस्थेत पाहून हादरली बायको, औरंगाबादेतील धक्कादायक घटना
..जेव्हा मायकल जॅक्सनने राज ठाकरेंना दिले होते तब्बल ४ कोटी रुपये, वाचा पुर्ण किस्सा

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now