लाखोंच्या पगाराची नोकरी सोडून ‘अशी’ शेती केली सुरु, आता ती करतेय करोडोंची कमाई

 

 

आजकाल महिला प्रत्येक क्षेत्रात उतरत असून पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून चालताना दिसत आहे. अनेक तरुणी शेती सुद्धा करताना दिसून येत आहे. आजची गोष्टही अशाच एका तरुणीची आहे, जिने शेती व्यवसाय सुरु केला असून ती या शेतीतून चांगलीच कमाई करत आहे.

मूळ केरळची असणाऱ्या या तरुणीचे नाव गीतांजली राजमणी असे आहे. वडिलांच्या मृत्युनंतर तिने आणि तिच्या आईने तिच्या लहान भावाला सांभाळले आहे. त्यांची आर्थिक परिस्थिती आधी खुप हालाकीची होती.
तिला झाडांबद्दल जाणून घ्यायला खुप आवडायचे. शिक्षण घेत असताना गीतांजलीने एमबीए केले. त्यानंतर तिने क्लिनिकल रिसर्च इंडस्ट्रीमध्ये १२ वर्षे काम केले. तसेच तिने टाटा कंसल्टेंसी सर्विसेसमध्येही काम केले होते.

कंपनीत काम करताना तिला अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या, त्यामध्ये सेल्स, हायरिंग, संचालन, प्रॉफिट-लॉस या गोष्टी होत्या. त्यानंतर तिने स्वता: ची कंपनी सुरु करण्याचा विचार केला. तिला आधीपासूनच ऑर्गेनिक फार्मिंगची आणि गार्डनिंगची आवड होती. तसेच तिचे पती सपोर्टीव्ह असल्याने तिला कंपनी सुरु करण्यात काही अडचण नाही आली.

२०१० मध्ये तिने शमीक चक्रवर्ती आणि सुदाकरन बालसुब्रमियन यांच्यासोबत मिळून सीओओ फार्मिझनची सुरुवात केली. तेव्हा ती भाज्यांवर रिसर्च करत होती. तेव्हा तिने त्याचाच व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला, ज्यामुळे शेतकऱ्यांनाही याचा फायदा होईल.

गीतांजलीने मीनी फार्म रेंटल ऍप तयार केले. या ऍपच्या माध्यामातून कोणतीही व्यक्ती आपल्या जवळच्या परिसरातील कोणत्याही शेतात ६०० स्क्वेअर फुटची एक मिनी फार्म महिन्याला फक्त २५०० रुपयांमध्ये भाडे तत्वावर घेऊ शकतो.

तसेच या ऍपच्या माध्यामातून ग्राहकाला हे समजते की या जागेत कोणत्या भाज्यांची लागवड केली पाहिजे. या कंपनीशी संबंधित असलेला कोणताही शेतकरी त्याच्या भाज्यांची ऑनलाईन विक्रीही करु शकतो. तसेच जो ग्राहक मिनी फार्म भाडे तत्वावर विकत घेतो, तो कधीही त्याच्या फार्मवर जाऊ शकतो.

ही शेती केल्याने शेतकऱ्यांना एक निश्चित उत्पन्न मिळते. जे की एका पारंपारिक शेतीच्या तिप्पट उत्पन्न मिळवून देण्यास मदत करते. सध्या फार्मिझन बंगळूरू, हैद्राबाद आणि सुरत या तीन शहरांमध्ये सुरु केलेले आहे.

गीतांजलीच्या या भन्नाट आयडियाला सगळ्यांनीच चांगला प्रतिसाद दिला आहे. आतापर्यंत १६ हजारांपेक्षा जास्त ग्राहकांना हि कल्पना आवडली आहे. २०१७ प्रमाणे तिच्या कंपनीचा टर्नओव्हर २० कोटींचा होता.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.