अपयशी विराटमुळेच आरसीबी आयपीएल जिंकली नाही; सुनील गावसकरांची सडेतोड टिका

इंडियन प्रीमियर लीगच्या १३ व्या पर्वात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरला (आरसीबी) जिंकता आले नाही. या अपयशासाठी कर्णधार विराट कोहलीचे फलंदाजीतील अपयश कारणीभूत आहे, अशी प्रतिक्रिया भारताचे माजी दिग्गज फलंदाज सुनील गावसकर यांनी व्यक्त केली.

आयपीएलच्या या हंगामात एलिमीनेटर सामन्यात सनरायझर्स हैदराबादने विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर बेंगलोरचा दणदणीत पराभव केला. सुनील गावस्कर यांनी यावर आपले मत व्यक्त करताना विराट कोहली वर निशाणा साधला.

कर्णधार विराट “कोहलीला फलंदाजी मध्ये यंदा चांगली कामगिरी करता आली नाही हे बेंगलोरला ट्रॉफी पटकावता न आल्याचे प्रमुख कारण आहे” असे गावसकर म्हणाले.

“जागतिक क्रिकेटमधील सध्याचा दर्जेदार फलंदाज असा लौकिक स्वतः विराटने कामगिरीच्या जोरावर मिळवला आहे. पण त्या लौकिकाला साजेशी कामगिरी करणेही त्याला या वर्षी जमले नाही” असे गावस्कर म्हणाले.

तसेच”विराट जेव्हा एबी डिव्हिलियर्ससोबत मोठी खेळी करतो, तेव्हा बँगलोर मोठा स्कोअर करते,” अशी प्रतिक्रिया गावसकर यांनी दिली. एलिमिनेटर सामन्यांत आरसीबीचा सनरायझर्स हैदराबादकडून ६ विकेट्सनी पराभव झाला.

या पराभवानंतर विराट कोहलीवर टीका होऊ लागली आहे. टीम इंडियाचा माजी सलामीवीर गौतम गंभीरने तर विराटला कर्णधारपदावरुन हटवण्याची मागणी केली आहे.

‘अर्णबचा छळ सुरूय; त्याच्या जीविताला धोका निर्माण झाल्‍यास ठाकरे सरकार जबाबदार’

अहमदनगरमध्ये उडाली खळबळ! जलसंधारण मंत्र्याच्या घरी सापडला मृतदेह

फटाक्यांवरील बंदीबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची मोठी घोषणा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.