Gautami Patil : गौतमी पाटीलची लावणी आणि प्रेक्षकांचा तुफान राडा! वेड्या झालेल्या प्रेक्षकांनी शाळा पाडली

Gautami Patil : लावणी म्हटलं की, प्रत्येकाचेच भान हरपून जात असते. लावणीच्या गाण्यावर ठेका धरणे, शिट्ट्या वाजवणे असे प्रकार प्रत्येकच ठिकाणी पाहायला मिळतात. असाच एक प्रकार सांगलीत घडला आहे. एका लावणीच्या कार्यक्रमात प्रेक्षकांनी जोरदार राडा केला आहे.

मिरज तालुक्यातील बेडग इथे एक लावणीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. प्रसिद्ध लावणी स्टार गौतमी पाटील हिने या कार्यक्रमात आपली लावणी सादर केली. तिची लावणी पाहण्यासाठी लोकांनी प्रचंड गर्दी केली होती. जिल्हा परिषद शाळेच्या जवळच हा लावणीचा कार्यक्रम सुरु होता.

गौतमी पाटीलची लावणी सुरु असताना प्रेक्षक चक्क शाळेच्या छतावर जाऊन बसले. इतकेच नव्हे ते तिथे नाचूही लागले. त्यामुळे शाळेच्या छताचा पार चुराडा झाला. छतावरील कौलांचं प्रचंड नुकसान झालं. तसेच काही प्रेक्षक लावणी पाहण्यासाठी झाडावर जाऊन बसले. त्यामुळे झाडही कोसळले.

या सगळ्यामुळे एकच गोंधळ उडाला. सांगली जिल्ह्यातील बेडग इथे सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच सत्कार समारंभ पार पडल्यांनंतर याठिकाणी लावणीचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. यावेळी सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवलेली लावणी सम्राज्ञी गौतमी पाटील हिच्या नृत्याचा कार्यक्रमदेखील ठेवण्यात आला होता.

यावेळी गौतमीची लावणी पाहण्यासाठी प्रेक्षकांची प्रचंड गर्दी जमली. प्रेक्षकांसाठी जागा नसल्याने काहीजण शाळेच्या छतावर जाऊन बसले तर काही झाडावर चढले. त्यामुळे कौलारू शाळेचं प्रचंड नुकसान झालं. आता या नुकसानीची भरपाई कोण करणार? असा सवाल ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे.

महत्वाच्या बातम्या
Rambha car accident : सलमान खानच्या प्रसिद्ध अभिनेत्रीचा भीषण अपघात, गाडीचा चक्काचूर तर मुलगी गंभीर जखमी
kirit somaiya : किरीट सोमय्यांमुळे माझ्या सासूचं निधन, किशोरी पेडणेकरांच्या खळबळजनक आरोपामुळे राजकीय वर्तुळात खळबळ
VIDEO: हातात मशाल अन् तोंडात पेट्रोल, फुंकर मारल्यावर असा भडका झाला की.., पाहून धक्का बसेल
Sachin tendulkar : याला म्हणतात साधेपणा! क्रिकेटच्या देवाने टपरीवाल्याचा चहा घेतला अन् त्याची इच्छाही पुर्ण केली