Share

Gautami Patil: आयच्या गावात! आकाशी रंगाची साडी, कॉलर नेक ब्लाऊज घालून गौतमी पाटीलचीच हवा, पहा फोटो

Gautami Patil : निळाशार किनारा, हिरव्यागार नारळबागा आणि मधोमध गौतमी पाटीलचा एआय स्टाईल व्हिडिओ सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. खास करून आकाशी रंगाची साडी आणि कॉलर नेक ब्लाऊजमधील तिचा सोज्वळ पण बोल्ड लूक पाहून चाहत्यांना थक्क व्हायला होत आहे.

काही दिवसांपूर्वी गौतमीने अभिजीत सावंत (Abhijit Sawant) सोबतचा एक सेल्फी सोशल मीडियावर पोस्ट केला होता. “Coming Soon” असे कॅप्शन देताच प्रेक्षकांनी दोघेही एका नवीन प्रोजेक्टसाठी एकत्र येत असल्याचा अंदाज वर्तवला होता. नव्याने समोर आलेल्या व्हिडिओने या चर्चांना आणखी बळकटी दिली असून दोघांच्या कोलॅबबद्दल उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

इंडियन आयडॉलमधून लोकप्रियता मिळवलेला आणि नेहमीच तरुणाईचा आवडता आवाज ठरलेला अभिजीत सध्या पुन्हा चर्चेत आला आहे. त्याने नुकतेच त्याच्या सदाबहार ‘मोहब्बत लुटाऊंगा’ या गाण्याचे नव्या पद्धतीने सादरीकरण केले असून तेही जोरदार चर्चेत आहे. गौतमीसोबत तो नेमकं कोणतं गाणं किंवा प्रोजेक्ट करत आहे, याबद्दल अद्याप अधिकृत माहिती नसली तरी लवकरच त्याचा खुलासा होणार असल्याचे प्रेक्षकांमध्ये बोलले जात आहे.

सुरेख आवाजाने आणि बिग बॉसमधील खेळीतून प्रेक्षकांच्या मनावर जागा मिळवणारा अभिजीत, आगामी काळात अनेक नवीन आणि वेगळ्या प्रोजेक्ट्समध्ये झळकणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे त्याची आणि गौतमीची जोडी नेमका कसा कंटेंट घेऊन येते, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

 

 

 

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now