‘ज्यांची तू आयुष्यभर काळजी घेतलीस, त्यांनीच तुझा आणि माझा विश्वासघात केला’

मुंबई | काही दिवसांपूर्वीच महारोगी सेवा समितीच्या सीईओ डॉ. शीतल आमटे यांनी आत्महत्या केली. यामुळे राज्यासह देशातील अनेकांना मोठा धक्का बसला. त्यानंतर २६ जानेवारीला शीतल यांच्या जन्मदिवशी शीतल यांचे पती गौतम करजगी यांनी फेसबूक पोस्ट केली आहे.

फेसबुक पोस्टमध्ये ते म्हणतात, ‘तू माझ्यासोबत नाहीस, यावर माझा अजूनही विश्वास बसत नाहीय. आपण चाळीशीचे झाल्यानंतर पुढचं जीवन कसं व्यतीत करायचं याबाबत अनेक योजना आपण आखल्या होत्या. त्यातच आयुष्यात वर्षांची भर घालण्यापेक्षा वर्षांमध्ये आयुष्याची भर घालत जाणं जास्त महत्त्वाचे आहे, असे तुझे नेहमी सांगणं असायचे’ असे गौतम करजगी यांनी म्हंटले आहे.

तसेच ‘मला आज खूप वेदना होत आहेत कारण ज्यांची तू आयुष्यभर काळजी घेतलीस, त्यांनीच तुझा आणि माझाही विश्वासघात केला आहे. तुझ्यापासून सुटका करून घेण्यात ते यशस्वी ठरलेत खरे पण आनंदवनाला ते तुझ्यापासून वेगळं करू शकणार नाहीत. कारण आनंदवनात बाबा आणि ताईंनंतरची जागा तू कधीच मिळवली आहेस,’ असे म्हणत त्यांनी आठवणींना उजाळा दिला.

वाचा डॉ. शीतल आमटे यांच्या मृत्युच्यादिवशी नेमकं काय घडलं होतं?
आनंदवनात डॉ. शीतल यांच्या शयन कक्षातून सकाळपासून बाहेर आल्या नसल्याची माहिती त्यांच्या घरी काम करणाऱ्या महिलेला मिळाली. त्यांच्या घरी काम करणाऱ्या महिला सविता बोपसे यांनी शीतल बाहेर का आल्या नाही? म्हणून शीतल यांच्या शयन कक्षात प्रवेश केला.

त्यावेळी त्यांना डॉ. शीतल या बेशुद्ध अवस्थेत दिसल्या. घर काम करणाऱ्या सविता बोपसे यांनी शीतल यांचे पती गौतम करजगी यांना बोलावून आणले. शीतल यांच्या भोवती काही औषधे पडल्याचे त्यावेळी लक्षात आले. शीतल आमटे त्यांच्या आनंदवन येथील घरी बेशुद्धावस्थेत सापडल्याने. त्यांना चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले.

महत्त्वाच्या बातम्या
आंदोलनकर्त्या सर्व शेतकऱ्यांना तुरुंगात टाकून त्यांची सगळी संपत्ती जप्त करा; बेताल कंगणा
मुकेश अंबानी, संजय राऊतांसह ९७ जणांना पद्म पुरस्कार देण्याची राज्याची शिफारस मोदी सरकारने नाकारली
‘हा पुरस्कार माझी झोळी भरणाऱ्यांचा, माझ्या लेकरांचा, मग उरलासुरला माझा’

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.