सूर्यकुमारला वगळने ही कोलकाता नाइट रायडर्सची गेल्या १३ वर्षातली सर्वात मोठी चुक

टीम इंडियाचा माजी सलामीवीर तसेच कोलकाता नाइट रायडर्सच्या (केकेआर) चा कर्णधार गौतम गंभीरने एका उत्तम फलंदाजाला संघातून वगळून केकेआरने मोठी चुक केली आहे असे मत व्यक्त केले आहे. संघाने २०१२ आणि २०१४ मध्ये आयपीएल करंडक जिंकला. यानंतर, पुढील सहा वर्षांत एकदा संघ अंतिम फेरीपर्यंत पोहोचू शकला नाही.

आयपीएलमधील केकेआरची सर्वात मोठी चूक काय आहे हे गंभीरने सांगितले आहे. गौतम गंभीर म्हणाला की,” सूर्यकुमार यादवला जाऊ देणे म्हणजे केकेआरची गेल्या १३ वर्षातील सर्वात मोठी चूक होती. सुर्यकुमार तरुण होता, तो केकेआरमध्ये आला, चार वर्षे खेळला. अर्थात ज्या ठिकाणी त्याला खेळायला हवे होते त्या क्रमांकावर त्याला संधी मिळाली नाही कारण त्यावेळी फलंदाजी लाईनअप नव्हती. ”

पुढे गंभीर म्हणाला की, “मनीष पांडे तिसर्‍या क्रमांकावर फलंदाजी करीत होता, पण सुर्यकुमार सहाव्या किंवा सातव्या क्रमांकावर फलंदाजी करीत होता. जेव्हा मी संघाचे नेतृत्व करीत होतो. तो उप-कर्णधार होता. सूर्यकुमार बरोबरचे नेतृत्व गुणवत्ता मी पाहत होतो, तो कोणत्याही क्रमांकावर फलंदाजी करू शकतो.”

सूर्यकुमार यादव मुंबई इंडियन्सच्या संघात सामील होण्यापूर्वी केकेआरच्या टीमचा एक भाग होता. आणि तो या संघासाठी चार वर्षे आयपीएलमध्ये खेळला. पण त्याने केकेआर संघ सोडला आणि २०१८ मध्ये, सूर्यकुमार यादव मुंबई इंडियन्सच्या संघात सामील झाला. सूर्यकुमार यादवने मुंबई इंडियन्सला इंडियन प्रीमियर लीग २०२० मध्ये जिंकण्यास मदत केली. यापूर्वी तो मुंबईसाठी सामना विजेता म्हणून उदयास आला आहे.

२०२० परोपकारी व्यक्तींच्या यादीत असीम प्रेमजी अव्वल स्थानी; दररोज २२ कोटींचे दान

‘हा’ विश्वचषक विजेता क्रिकेटपटू म्हणतोय, सुर्यकुमार यादव हा भारताचा एबी डिव्हीलीयर्स

मुख्यमंत्री पदाबाबत वेगवेगळी वक्तव्ये होत असताना नितीशकुमारांनी सोडले मौन, म्हणाले..

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.