विराट इतका अपयशी कर्णधार दाखवून द्या; जो सतत हरतोय तरी संघात आहे

दिल्ली | शुक्रवारी झालेल्या पराभवानंतर यावर्षीसुद्धा बेंगलोरचे IPL ट्रॉफी जिंकण्याचे स्वप्न अधुरेच राहिले. हैदराबादने बंगलोरचा पराभव करून कोहलीचे ट्रॉफीचे स्वप्न धुळीत मिळवले.

यानंतर गौतम गंभीरने बेंगलोरच्या खराब प्रदर्शनसाठी विराट कोहलीला जबाबदार ठरवत त्याच्यावर जोरदार टीका केली आहे. विराटला कर्णधारपदावरून काढून टाकले पाहिजे अशी मागणी गौतमने केली आहे. गौतमने अतिशय गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.

आठ वर्षांपासून विराट या संघाचा कर्णधार आहे पण त्याला एकही पदक मिळवता आले नाही. ८ वर्षे खूप मोठा काळ आहे. मला अशा दुसऱ्या कर्णधाराबद्दल सांगा. जरी आपण कर्णधार सोडला तरी अशा कोणत्याही खेळाडूबद्दल सांगा जो ८ वर्षे न जिंकता एखाद्या संघात स्थान मिळवत आहे, असे तो म्हणाला.

पुढे गंभीर म्हणाल की, कोहलीने आपल्या कर्णधारपदाची कमतरता मान्य करून स्वतःहून राजीनामा द्यावा. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरची टीम एकदाही आयपीएलचे विजेतेपद जिंकू शकली नाही, अशी गौतम गंभीरने केली आहे.

आरसीबीसह दिल्ली कॅपिटल्स आणि किंग्स इलेव्हन पंजाबदेखील आपल्या पहिल्या IPL विजेतेपदासाठी प्रयत्न करत आहेत. मुंबई इंडियन्स फायनलमध्ये पोहोचले आहेत. आता फायनलमध्ये त्यांच्याशी कोणता संघ सामना करेल याची आतुरतेने वाट चाहते बघत आहेत.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.