एक खेळाडू पाच वेळा आयपीएल जिंकतो तर दुसरा एकदाही नाही; गंभीरचा विराटला टोला

मंगळवारी इंडियन प्रीमियर लीग २०२० च्या अंतिम सामन्यात मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटलचा पराभव करत पाचव्या वेळी जेतेपद जिंकले आहे. रोहितच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्स संघाने पुन्हा एकदा ट्रॉफी जिंकली आहे. यावर कोलकाता नाईट रायडर्सला स्वतःच्या नेतृत्वात दोनदा चॅम्पियन बनविणाऱ्या गौतम गंभीरने रोहितचे कौतुक करत विराट कोहलीला टोमणे मारले आहेत.

क्रिकइन्फोशी झालेल्या संभाषणात गंभीरने वेगळ्या स्वरूपासाठी वेगळ्या कर्णधाराविषयीही सांगितले. गंभीर म्हणाला की “लोक म्हणु शकतात रोहितची वेळ चुकीची होती कारण त्यावेळी विराट कोहली कर्णाधार होता. तसेच आपल्याला वेगवेगळ्या स्वरूपात वेगळा कर्णधार मिळू शकेल. त्यात कोणताही दोष नाही.”

पुढे गंभीर म्हणाला की, रोहितने हे सिद्ध केले आहे की व्हाइट बॉलच्या कर्णधारपदामध्ये त्याच्या आणि विराट कोहलीच्या कर्णधारपदामध्ये किती फरक आहे. एका खेळाडू पाच वेळा आयपीएल करंडक जिंकतो तर दुसरा एकदादेखील जिंकलेला नाही. असे म्हणत गंभीराने विराटला टोमणा मारला आहे.

गंभीर पुढे म्हणाला, “विराट कोहली हा खराब कर्णधार नाही परंतु विराट आणि रोहितला समान व्यासपीठ मिळाले आहे, जिथे रोहितने स्वत: ला अधिक चांगले सिद्ध केले आहे. जर रोहित शर्मा भारताचा कर्णधार झाला नाही तर ते भारताचे दुर्दैव आहे. रोहित शर्माचा नाही ” असे गौतम गंभीरने म्हटले आहे.

देवेंद्र फडणवीसांनी बिहार आणलं, महाराष्ट्रालाही तेच पाहिजेत – नितेश राणे

भाजप ज्या पद्धतीने मित्रांनाच संपवतोय याचं उत्तम उदाहरण यानिमित्ताने बिहारमध्ये पहायला मिळालं”

अर्णबच्या वकिलांचा सवाल; ‘…मग मुख्यमंत्र्यांनाही अटक करणार का?’

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.