लाईव्ह शोमध्ये गौतम गंभीर आणि आकाश चोप्रा आमने सामने; ‘हा’ आहे वादाचा मुद्दा

आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सला पाच विजेतेपद मिळवून देणारा रोहित शर्मा आणि टीम इंडिया आणि आयपीएल फ्रेंचायझी संघ आणि आरसीबीचा कर्णधार विराट कोहली या दोघांत कोण चांगला आहे यावरून वाद पेटला आहे. आता या वादात गौतम गंभीर आणि आकाश चोप्रा यांनी उडी मारली आहे.

स्टार स्पोट्स वाहिनीवर T 20 क्रिकेटमध्ये भारताचे नेतृत्व कोणी करावे? या मुद्द्यावर चर्चा सुरू होती. त्यावेळी बोलताना गंभीर म्हणाला, विराट खराब कर्णधार आहे, असं मी म्हणत नाही, पण रोहित उत्कृष्ट कर्णधार आहे. या दोघांमध्ये जमीन-आसमानाचा फरक आहे.

तर यावर आकाश चोप्राचा यांनी विराटला पाठिंबा दिला आहे. पुढच्या वर्षी होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपसाठी नवीन टीम बनवायला वेळ नसल्याचे आकाश चोप्रा म्हणाले. टी-20 वर्ल्ड कपआधी भारत पाच-सहा टी-20 मॅचच खेळणार आहे. विराटचं कर्णधारपद बदलावं, असं काहीच झालेलं नाही. ज्या गोष्टी तुटलेल्या नाहीत, त्या जोडण्यात काय अर्थ आहे? अशी प्रतिक्रिया आकाश चोप्राने दिली.

गौतम गंभीर आणि आकाश चोप्रा दोघंही दिल्लीकडून स्थानिक क्रिकेट खेळले असले, तरी ते चांगले मित्र नाहीत. सप्टेंबर महिन्यात गौतम गंभीरने धोनीवर आयपीएल मध्ये सातव्या क्रमांकावर खेळण्यावरून टीका केली होती. त्या मॅचमध्ये चेन्नई राजस्थानने ठेवलेल्या २१७ रनच्या आव्हानाचा पाठलाग करत होती. गंभीरच्या या टीकेवर आकाश चोप्राने निशाणा साधला होता. गौतम गंभीर धोनीवर टीका करण्यासाठीच ओळखला जातो, असे आकाश चोप्रा म्हणाले होते.

मालामाल होतोय धोनी! शेतातील टोमॅटो आणि दुधाची सूरू झाली विक्री; किंमत तर बघा..

श्रीदेवीच्या लाईव्ह शो दरम्यान धर्मेंद्रने दारु पिऊन केला होता तमाशा कारण…

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.