नुकताच फोर्ब्सचा जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीसंदर्भातील एक अहवाल प्रसिद्ध झाला आहे. या अहवालानुसार भारतातील अदानी समूहाचे सर्वेसर्वा आणि उद्योगपती गौतम अदानी(Gautam Adani)जगातील श्रीमंतांच्या यादीत चौथ्या स्थानावर आले आहेत. यावेळी उद्योगपती गौतम अदानी यांनी जगातील श्रीमंतांच्या यादीत मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांना देखील मागे टाकले आहे.(Gautam Adani became the fourth richest person in the world)
मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स या यादीत पाचव्या स्थानावर आहेत. फोर्ब्सच्या अहवालानुसार, उद्योगपती गौतम अदानी यांची एकूण संपत्ती ११३ अब्ज डॉलर झाली आहे. तर मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांची एकूण संपत्ती १०२ अब्ज डॉलर आहे. फोर्ब्सच्या या अहवालामध्ये जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींची एक यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
फोर्ब्सच्या या यादीमध्ये टेस्ला कंपनीचे संस्थापक इलॉन मस्क पहिल्या स्थानावर आहेत. टेस्ला कंपनीचे संस्थापक इलॉन मस्क यांची एकूण संपत्ती २२३ अब्ज डॉलर आहे. फ्रेंच लक्झरीचे मालक बर्नार्ड अरनॉल्ट हे या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहेत. बर्नार्ड अरनॉल्ट यांची एकूण संपत्ती १४५ अब्ज डॉलर आहे. अमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस हे फोर्ब्सच्या या यादीमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहेत.
अमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांची एकूण संपत्ती १३६ अब्ज डॉलर आहे. उद्योगपती मुकेश अंबानी फोर्ब्सच्या या यादीमध्ये मागे पडले आहेत. उद्योगपती मुकेश अंबानी यांची एकूण संपत्ती ८७ अब्ज डॉलर झाली आहे. उद्योगपती गौतम अदानी आणि मुकेश अंबानी यांच्या संपत्तीमधील अंतर तब्बल २६ अब्ज डॉलर झाले आहे.
जगातील उद्योगपती गौतम अदानी यांची संपत्ती झपाट्याने वाढत आहे. २०२२ या वर्षामध्ये उद्योगपती गौतम अदानी यांची संपत्ती २३ अब्ज डॉलरने वाढली आहे. २०२१ या वर्षात उद्योगपती गौतम अदानी यांची संपत्ती ४० अब्ज डॉलरने वाढली होती. २०२२ या वर्षात उद्योगपती गौतम अदानी भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती झाले आहेत.
मागील काही महिन्यांपासून अदानी समूहाच्या शेअर्समध्ये मोठी वाढ दिसून आली आहे. यामुळे अदानी समूहाच्या शेअर्सच्या मूल्यात देखील वाढ झाली आहे. या कारणांमुळे उद्योगपती गौतम अदानी यांची संपत्ती झपाट्याने वाढली आहे. काही दिवसांपूर्वी अदानी ग्रुपने जगातील सर्वात मोठी सिमेंट कंपनी होल्सीम ग्रुपचा संपूर्ण भारतातील व्यवसाय ताब्यात घेण्यासाठी करार केला होता.
महत्वाच्या बातम्या :-
दर महिन्याला पैसै देतो फक्त माझी.., २५ लाखात अभिनेत्रीसोबत बिझनेसमन करणार होता ‘हे’ कृत्य
दिशाने लीक केला एक व्हिलन रिटर्न्सचा क्लायमॅक्स, यावेळी सगळ्यात खतरनाक खलनायक कोण?
४ वर्षांनंतर ‘या’ एका अटीवर पुनरागमनासाठी तयार झाला शाहरूख, यावर्षीही नाही दिसणार पडद्यावर






