२१ वर्षांपासून ही बहिण सीमेवरच्या सगळ्या जवानांना बांधत आहे राखी, वाचा तिला कोठून मिळाली ही प्रेरणा

रक्षाबंधन हा सण भाऊ आणि बहिणीच्या पवित्र नात्याचे प्रतीक आहे. या दिवशी बहिणी आपल्या भावांच्या मनगटावर राखी बांधतात आणि त्यांना दीर्घायुष्याची शुभेच्छा देतात. त्याच वेळी, भाऊ आपल्या बहिणींचे आयुष्यभर संरक्षण करण्याचे वचन देतात.

मित्रांनो, आपल्या देशातील काही बहिणी आहेत, ज्या दरवर्षी सीमेला भेट देतात आणि भारतीय सैनिकांना राखी बांधतात, कारण त्यांना माहित आहे की देशाच्या सेवेत गुंतलेले आमचे सैनिक त्यांच्या खास बहिणींना या विशेष दिवशी त्यांना आपल्या बहिणीची खुप आठवण येत असते.

पण त्यांना आपल्या देशसेवेमुळे घरी जाता येत नाही किंवा आपल्या बहिणीला भेटता येत नाही. पण त्यांना देशातील काही बहिणी राख्या पाठवतात किंवा त्यांना तेथे जाऊन राखी बांधतात. आज आम्ही तुम्हाला देशाच्या अशा एका बहिणीची ओळख करून देणार आहोत जी 21 वर्षांपासून सतत सीमेवर भेट देऊन शूर सैनिकांना राखी बांधत आहे.

गौरी बाळापुरे
सैनिकांच्या त्या बहिणीचे नाव गौरी बाळापुरे आहे, जी सतत 21 वर्षांपासून देशाच्या सेवेत गुंतलेल्या सैनिकांसाठी राखी बांधत आहेत. गौरी बाळापुरे मूळच्या मध्य प्रदेशातील बैतूल जिल्ह्यातील आहेत. त्याचदरम्यान आता हे नाते इतके खोलवर रूजलेले आहे की जवान जेव्हा त्यांच्या सुट्ट्या घालवण्यासाठी त्यांच्या घरी जातात, तेव्हा ते त्यांची बहीण गौरीला भेटायलाही येतात.

कशी मिळाली प्रेरणा
हा प्रश्न तुमच्या मनात येऊ शकतो की गौरीला सीमेवर जाऊन सैनिकांना राखी बांधण्याची प्रेरणा कशी मिळाली? वास्तविक, यामागेही एक घटना आहे. असे म्हटले जाते की जेव्हा देश कारगिल युद्धाच्या भीतीशी लढत होता.

त्या काळात 600 सैनिक टायगर हिलवर कब्जा करताना शहीद झाले. या घटनेनंतर गौरीने ठरवले की ती दरवर्षी सीमेवर जाऊन सैनिकांना राखी बांधेल. तेव्हापासून २१ वर्षे झाली तरी त्या न विसरता सैनिकांना राखी बांधायला जातात. पण यावर्षी कोरोनामुळे त्या जाऊ शकल्या नाहीत.

बैतुल सांस्कृतिक समिती
असे म्हटले जाते की गौरी बाळापुरे यांनी बैतूल जिल्ह्यातील 10 बहिणींसोबत ‘बैतुल सांस्कृतिक समिती’ स्थापन केली आणि तिने प्रतिज्ञा घेतली की ती दरवर्षी सीमेवर जाऊन सैनिकांसोबत रक्षाबंधनाचा सण साजरा करेल. गौरीने चारही दिशांच्या सीमेवर तैनात असलेल्या अनेक सैनिकांना राखी बांधली आहे.

सैनिकांशी अतुट असलेले नाते
ज्या सीमेवर गौरीने राखी बांधली आहे तेथील सैनिकांसोबत गौरीचे घनिष्ट संबंध आहेत. गौरीचे लष्करी बंधू त्यांच्या सुट्ट्यांमध्ये गौरीला भेट देतात. ते गौरीला भेटवस्तू आणि पत्रे पाठवतात. यासोबतच गौरीला लग्न किंवा इतर कोणत्याही कार्यक्रमाला येण्याचे आमंत्रणही येते. गौरीच्या लष्करी भावांमध्ये मोठ्या लष्करी अधिकाऱ्यांपासून सामान्य सैनिकांचा समावेश आहे.

कोरोना संसर्गामुळे जाऊ शकली नाही
वर्ष 2020 मध्ये, कोरोना संसर्गामुळे, गौरी रक्षाबंधनाचा सण साजरा करण्यासाठी सीमेवर जाऊ शकली नाही, परंतु तिने पोस्टद्वारे सैनिकांना राख्या पाठवल्या. गौरी बेतुलच्या ‘राष्ट्रीय संरक्षण मिशन समिती’च्या अध्यक्ष आहेत आणि त्यांच्यासोबत आणखी बरेच सदस्य सामील झाले आहेत.

त्यांचे हे कार्य खरंच खुप कौतुकास्पद आहे. पुर्ण देशातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. अनेक स्त्रीया पुढे येऊन त्यांच्या या कार्यात त्यांना मदर करत आहेत. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कळवा. जर ही माहिती आवडली असेल तर पुढे पाठवायला विसरू नका.

महत्वाच्या बातम्या
२१ वर्षांपासून ही बहिण सीमेवरच्या सगळ्या जवानांना बांधत आहे राखी, वाचा तिला कोठून मिळाली ही प्रेरणा
सुंदर पिचाई यांना आपल्या पत्नीला भेटायला उशीर झाला आणि गुगल मॅप्सची स्थापना झाली, वाचा किस्सा
डायरेक्टरने रात्री सोबत झोपण्याची ऑफर केल्यावर मराठमोळ्या श्रुती मराठेने काय उत्तर दिले पहा…
काहीही झालं तरी पाचव्या सामन्यात ‘या’ खेळाडूला बाहेर बसवू नका; गावस्करांचा टिम इंडीयाला सल्ला

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.