महाराष्ट्राची हास्यजत्रा हा शो आज घराघरात पोहोचला आहे. प्रेक्षकांना खळखळून हसायला लावणारा हा शो आज प्रत्येक घरात पाहिला जातो. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे त्यातील कलाकार. त्यातील कलाकारांचा विनोदी अभिनय पाहून प्रेक्षक खळखळून हसल्याशिवाय राहत नाहीत.
लहानांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वजण हा शो मोठ्या आवडीने पाहतात. फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर विदेशात राहणारे मराठी लोकंही हा शो पाहतात. देशाच्या बाहेरही त्यांचा मोठा चाहतावर्ग आहे. त्यामुळे हास्यजत्रेच्या टीमने विदेशातील आपल्या चाहत्यांना मोठं सरप्राईज दिलं.
महाराष्ट्राची हास्यजत्रा या शोचा दुबईतही मोठा चाहतावर्ग आहे हे खुप कमी लोकांना माहिती आहे. अनेक मराठी माणसं दुबईत स्थायिक झाले आहेत. त्यांच्यासाठी महाराष्ट्राची हास्यजत्रा टीमने दुबईत पहिला शो ठेवला होता. ही त्यांची पहिलीच विदेश वारी होती.
या शोसाठी दुबईतील मराठी माणसं अतुरली होती. हास्यजत्रा टीमचा दुबई दौरा चांगलाच चर्चेचा विषय ठरला. त्याचे काही व्हिडीओ आणि फोटो सोशल मिडीयावर व्हायरल झाले आहेत. प्रेक्षकांना आपल्या आवडत्या कलाकारांना भेटून खुप आनंद झाला. तर दुसरीकडे कलाकारांना मिळालेला प्रतिसाद पाहून ते ही भारावून गेले होते.
यादरम्यान, फिल्टरपाडाचा बच्चन गौरव मोरे याने एक खास पोस्ट शेअर केली आहे. गौरव मोरे हा हास्यजत्रेचा महत्वाचा भाग आहे. त्याचा एक खास चाहतावर्ग आहे जो त्याच्यावर खुप प्रेम करतो. गौरवचा अभिनय कसा आहे हे सर्वांनाच माहिती आहे.
त्याच्या अभिनयाने त्याने प्रत्येकाच्या मनात घर केले आहे. गौरव मोरे सोशल मिडीयावर प्रचंड ऍक्टीव्ह असतो. तो सतत आपल्या आयुष्याबद्दल काहीतरी पोस्ट करत असतो आणि लिहीत असतो. गौरवने आपल्या दुबई दौऱ्याचा एक व्हिडीओ शेअर केला आहे.
त्याने आपल्या पोस्टमध्ये लिहीले आहे की, एक कलाकार म्हणून अजून काय पाहिजे? मला फार बोलता येत नाही पण तुम्ही माझ्यावर जे प्रेम केलत, करताय त्याच ऋण कसं फेडावं? हे काही मला सुचत नाहीये. फक्त एवढच बोलू शकतो. मायबाप प्रेक्षकहो खुप खुप धन्यवाद आणि खुप खुप धन्यवाद दुबई लव यु, अशी पोस्ट गौरव मोरेनी केली आहे. तो भावूक झालेला दिसत आहे.
महत्वाच्या बातम्या
भाषेत शुद्ध अशुद्ध असं काही नसंत, भाषेचा हेतू शुद्ध ठरवणं नसून…; प्रमाण भाषेचा आग्रह धरणारांना नागराजने खडसावले
सिंकदरच्या कुस्तीचा निकाल देणाऱ्या पंचांना खरच दिली धमकी? अखेर सिकंदरने समोर आणले सत्य
कुत्र्यापासून वाचण्यासाठी डिलीव्हरी बॉयने उचलले धक्कादायक पाऊल, उपचारादरम्यान मृत्यु
दोन मुलींनंतर मुलगा झाल्याने नवस फेडायला पशुपतीनाथला गेला पण विमान अपघातात काळाने घातला घाव