अभिनेत्री आलिया भट्टची(Alia Bhatt) मुख्य भूमिका असलेल्या ‘गंगुबाई काठियावाडी’ ला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहेत. ‘गंगुबाई काठियावाडी’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई केली आहे. कोरोना महामारीत देखील या सिनेमाचे शो हाऊसफुल्ल होत आहेत. आलीय भट्टच्या या सिनेमाने अभिनेत्री कंगनाच्या अनेक सिनेमांना धूळ चारली आहे.(gaungubai kathiyvadi film collected 40 corers in 3 days )
‘गंगुबाई काठियावाडी’ या सिनेमाने पहिल्याच दिवशी १०.५० कोटींचा गल्ला जमवला आहे. शनिवारी या सिनेमाने १३.३२ कोटी रुपयांची कमाई केली आहे. एवढेच नाही तर रविवारी या सिनेमाने बॉक्स ऑफिसर १६.५० कोटी रुपयांची कमाई केली आहे. या सिनेमाने फक्त तीन दिवसांत ४० कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई केली आहे.
आज महाशिवरात्रीमुळे सार्वजनिक सुट्टी असल्याने हा आकडा वाढण्याची शक्यता आहे. ‘गंगुबाई काठियावाडी’ हा सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वी अभिनेत्री कंगना राणावतने चित्रपटाच्या निर्मात्यांवर टीका केली होती. यावेळी अभिनेत्री कंगना राणावतने आलिया भट्टवर देखील निशाणा साधला होता. अभिनेत्री कंगना राणावतने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून यासंदर्भात एक पोस्ट केली होती.
त्या पोस्टमध्ये अभिनेत्री कंगनाने लिहिले होते की, ” आलियाचं कास्टिंग चुकीचं झालं आहे. या सिनेमावर लावण्यात आलेले २०० कोटी रुपये देखील पाण्यात जातील. कारण हा सिनेमा चालणार नाही.” पण अभिनेत्री कंगना राणावतचे हे विधान खोटे ठरले आहे. अभिनेत्री आलिया भट्टची मुख्य भूमिका असलेल्या ‘गंगुबाई काठियावाडी’ या सिनेमाने अपेक्षेपेक्षा जास्त कमाई केली आहे.
अभिनेत्री आलिया भट्टच्या या सिनेमाने पहिल्याच आठवड्यात कंगनाच्या अनेक सिनेमांपेक्षा जास्त कमाई केली आहे. काही दिवसांपूर्वी अभिनेत्री कंगना राणावतचा ‘थलायवी’ हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. पण या सिनेमाला बॉक्स ऑफिसवर कमाल दाखवता आली नाही. या सिनेमाच्या हिंदी व्हर्जनने एकूण १.४६ कोटी रुपयांची कमाई केली होती.
त्याआधी अभिनेत्री कंगना राणावतचा ‘पंगा’ नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या सिनेमाला समीक्षकांची पसंती मिळाली होती. पण हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगलाच आपटला. मिळालेल्या माहितीनुसार, या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर एकूण २८.८९ कोटी रुपयांची कमाई केली होती. त्या तुलनेत अभिनेत्री आलिया भट्टच्या ‘गंगुबाई काठियावाडी’ या सिनेमाने बक्कळ कमाई केली आहे.
महत्वाच्या बातम्या :-
‘क्रिकेटचे बॉल खाण्यासारखे आहेत’; रोहीत शर्माच्या विचीत्र ट्विट्सने क्रिकेटविश्वात खळबळ
PHOTO: कहर! उर्फी जावेदने घातला मच्छरदानीपेक्षा पातळ ड्रेस, विचित्र फॅशन पाहून नेटकरीही संतापले
रेमोला ‘कालिया’ आणि ‘कालू’ म्हणायचे लोक, यायचा खुप राग, पण आईच्या ‘या’ गोष्टीने बदलले विचार