अभिनेत्री गौहर खान उतरली पॅलेस्टाईनच्या समर्थनात, इस्त्रायलला धडा शिकवण्यासाठी केले ‘हे’ आवाहन

इस्त्रायल आणि पॅलेस्टाईनमध्ये तणावाचे वातावरणात निर्माण झाले आहे. अशात अभिनेत्री गौहर खान हिने पॅलेस्टाईनचे उघडपणे समर्थन केले आहे. गौहरने इस्त्रायली वस्तूंवर बहिष्कार घालण्याची मागणी केली आहे.

इस्त्रायल आणि पॅलेस्टाईनमधील युद्ध आणि तणावाच्या वातावरणात संपूर्ण जग दोन भागात विभागले गेले आहे. बॉलिवूडमध्येही कंगना राणावतपासून ते नोरा फतेहीपर्यंत या संघर्षावर अनेकांनी आपल्या भूमिका स्पष्ट केल्या आहेत.

दरम्यान आता प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री आणि ‘बिग बॉस’ फेम गौहर खान हिचे नाव या संघर्षाबाबत प्रतिक्रिया देणाऱ्या बॉलिवूड कलाकारांमध्ये जोडले गेले आहे. गौहर खानने उघडपणे पॅलेस्टाईनचे समर्थन केले आहे.

एवढेच नाही तर पॅलेस्टाईनचे समर्थन करण्यासाठी गौहर खानने चाहत्यांना आवाहन केले आहे. यासाठी तिने इस्त्रायली वस्तूंवर बहिष्कार घालण्याची मागणीही केली आहे. याबाबत गौहरने पॅलेस्टाईनला समर्थन देणारी स्टोरी इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. यामध्ये  लिहिले आहे की, जर तुमची सोबत असेल तर तुम्ही इस्त्रायली उत्पादने वापरू नका.

गौहर खानने सोशल मीडियावर इस्रायलशी संबंधित काही उत्पादनांची यादी जाहीर केली आहे. त्याचबरोबर तिने लिहिले आहे की, जे लोक पॅलेस्टाईनचे दुख: आणि वेदना समजू शकतात त्यांनी या उत्पादनांवर बहिष्कार टाकला पाहिजे. गौहर खानची ही पोस्ट आता सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

कंगना, नोरा यांनीही आपले मत व्यक्त केले आहे:
इस्त्रायल आणि पॅलेस्टाईनच्या मुद्दय़ावर यापूर्वी कंगना राणावत आणि क्रिकेटपटू इरफान पठाण यांच्यात वाद रंगला होता. तसेच नोरा फतेहीने स्पष्टपणे इस्त्रायलच्या गाझावरील केलेल्या कारवाईवर संताप व्यक्त केला होता. तीने पॅलेस्टाईनमधील लोकांच्या दुख:त सहभागी असल्याचे म्हटले होते. या मुद्द्यावर नोराने इस्रायलला पाठिंबा दिला आहे.

महत्वाच्या बातम्या-
सोनू सूद म्हणजे देवच! सोनू सूदच्या फोटोला लोकांनी चढविला हार; दुधाने घातला अभिषेक
मी हे खपवून घेणार नाही; लग्नाच्या पोस्टवर घाण कमेंट करणाऱ्यांना सोनाली कुलकर्णीची थेट धमकी
द वॉल राहुल द्रविड होणार टीम इंडियाचा नवीन कोच, बीसीसीआयकडून माहिती  

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.