गश्मीर महाजनी साकारणार सरसेनापती हंबीरराव; पोस्टर पाहून मुजराच ठोकाल

मुंबई : कोरोना संकटानंतर मराठी चित्रपटसृष्टी हळूहळू पूर्वपदावर येत आहे. अशातच शिवजयंतीच्या मुहूर्तावर लेखक, दिग्दर्शक प्रविण विठ्ठल तरडे यांच्या आगामी ‘सरसेनापती हंबीरराव’ या बहुप्रतीक्षित चित्रपटातील ‘ती’ महत्वपूर्ण व्यक्तिरेखा कोण साकारणार हे समोर आले.

प्रविण विठ्ठल तरडे यांच्या ‘मुळशी पॅटर्न’ या संवेदनशील, सामाजिक चित्रपटाने प्रेक्षकांची मने जिंकत बॉक्सऑफिसवर यश संपादन केले. यामुळे तरडे यांचा पुढचा चित्रपट कोणता? याबद्दल रसिकांच्या मानत उत्सुकता होती, तरडे यांनी ‘सरसेनापती हंबीरराव’ या ऐतिहासिक चित्रपटाची घोषणा केल्यापासून महाराष्ट्रासह जगभरातील चाहते या ऐतिहासिक चित्रपटाची मोठ्या उत्सुकतेने वाट पाहत आहेत.

प्रविण विठ्ठल तरडे यांची कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन असलेल्या ‘सरसेनापती हंबीरराव’ मध्ये कोणते कलाकार, कोणती ऐतिहासिक व्यक्तिरेखा साकारणार? याबद्दल प्रेक्षकांच्या मनात प्रचंड उत्सुकता असल्याचे दिसले.

शिवजयंतीच्या मुहूर्तावर यातील एका महत्वपूर्ण व्यक्तिरेखेचा उलगडा झाला. मराठीतील हॅंड्सम हंक अभिनेता गश्मीर महाजनी ‘सरसेनापती हंबीरराव’ चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांच्या महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार असल्याचे आज स्पष्ट झाले.

उर्वीता प्रॉडक्शन्स निर्मित, शेखर मोहिते पाटील, सौजन्य सुर्यकांतराव निकम, धर्मेंद्र सुभाष बोरा यांची निर्मिती असलेल्या ‘सरसेनापती हंबीरराव’ या भव्य, ऐतिहासिक चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत कोण? या प्रश्नाचे उत्तर मिळाले. आता सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्यासह अन्य ऐतिहासिक व्यक्तिरेखा कोण साकारणार? हे जाणून घेण्याबद्दलचे मोठे औत्सुक्य प्रेक्षकांच्या मनात निर्माण झाले आहे.

महत्त्वाच्या बातम्या
पुन्हा लॉकडाऊन? नवे नियम लागू, वाचा कुठे काय बंद आणि काय सुरू राहणार
औरंगाबादेत करोना लस घेतलेले दोन डॉक्टर कोरोना पॉझिटिव्ह; आरोग्य यंत्रणेची उडाली झोप
सरकारने रायगडावर केलेल्या ’त्या’ गोष्टीवरून संभाजीराजे भडकले; म्हणाले हा तर काळा दिवस..

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.