धावत्या बसमध्ये घुसला ८० फुटांचा गॅस पाईप, प्रवाशाचे शीर झाले धडापासून वेगळे

देशात अनेक विचित्र अपघात आपण बघत असतो. असाच एक अपघात राजस्थानमधील पाली जिल्ह्यात झाला आहे. रस्त्याच्या बाजूने गॅसची पाईपलाइन टाकण्याचे काम सुरु होते. त्याचवेळी एक ८० फुटांचा लांब पाईप दुसऱ्या ठिकाणी हलवण्याचे काम सुरु होते.

हायड्रॉलिक मशीनच्या ऑप्रेटरकडून झालेल्या चुकीमुळे हा ८० फुटांचा गॅस पाईप थेट रस्त्यावरुन जाणाऱ्या बसच्या आरपार गेला. या अपघातामध्ये एका प्रवाशाचे डोके आणि धड वेगळे झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला तर अन्य एका प्रवाशाच्या डोक्यालाही गंभीर दुखापत झाल्याने त्याचाही मृत्यू झाला. या अपघातामुळे परिसरात एकच खळबळ उडाली.

या पाईपचे फोटो बघूनच हा अपघात किती भीषण होता याचा अंदाज येतो. संध्याकाळी चारच्या सुमारास मारवाड जंक्शनवरुन पुण्याच्या दिशेने ही प्रवाशी बस जात होती. त्याचवेळी हायड्रॉलिक मशीनच्या मदतीने गॅसचे ८० फुटांचे पाईप हलवणाऱ्या मशीन ऑप्रेटरने गॅसचा पाईप थेट हायवेवर आणला.

अंदाज न आल्याने आणि मशीनवरील नियंत्रण सुटल्याने हायड्रॉलिक मशीनच्या क्रेनला लटकणारा पाईप थेट खासगी बसच्या खिडकीच्या काचा फोडून दुसऱ्या बाजूने बाहेर आला. यामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर 12 जण जखमी झाले.

या विचित्र अपघाताची देशभरात चर्चा आहे. या अपघातामुळे रोडवर एकच गर्दी झाली होती. एका प्रवाशाचे डोके आणि धड वेगळे झाल्याने बघणारी गर्दी मोठी होती.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.