गॅस सिलिंडरच्या नवीन किंमती २ डिसेंबरपासून लागू, जाणून घ्या किंमती

वाढत्या महागाईमुळे आता गॅस सिलेंडरचेही भाव वाढले आहेत. सरकारी तेल कंपन्यांनी देशात स्वयंपाकाच्या गॅसचे दर वाढविले आहेत. आजपासून एलपीजी सिलिंडर ५० रुपयांनी महाग झाला आहे. एलपीजी गॅस सिलिंडरच्या नवीन किमती 2 आजपासून लागू झाल्या आहेत.

तसेच या वाढीनंतर देशाच्या राजधानीत देशांतर्गत एलपीजीची किंमत ६४५ रुपयांवर गेली आहे. १ डिसेंबर रोजी तेल विपणन कंपन्यांनी व्यावसायिक गॅसचे दर वाढविले. १९ किलो सिलिंडरच्या दरामध्ये ५५ रुपयांची वाढ करण्यात आली.

स्वयंपाक गॅसची किंमत तपासण्यासाठी आपल्याला सरकारी तेल कंपनीच्या वेबसाइटवर जावे लागेल. येथील कंपन्या दरमहा नवीन दर जारी करतात. https://iocl.com/Products/IndaneGas.aspx या लिंकला भेट देऊन आपण आपल्या शहरातील गॅस सिलिंडर्सचे दर तपासू शकता.

तर डिसेंबरच्या आधी जुलैमध्ये १४ किलो एलपीजी सिलिंडरच्या किमतीत वाढ करण्यात आली होती. जुलैमध्ये केवळ ४ रुपये किमतीत वाढ करण्यात आली होती. त्याच वेळी जून महिन्यात दिल्लीमध्ये १४.२ किलो विनाअनुदानित एलपीजी सिलिंडर ११.५० रुपयांनी महागले होते, मेमध्ये ते १६२.५० रुपयांनी स्वस्त झाले.

तर १९ किलो कमर्शियल गॅस सिलिंडरचाही दर वाढला आहे. हा सिलिंडर आता ५५ रुपयांनी महाग होईल. यापूर्वी जुलैमध्ये १४.२ किलो एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत ४ रुपयांची वाढ झाली होती.

‘ते’ विधान भोवलं! कंगनाला कायदेशीर नोटीस; ‘त्या वृद्ध महिलेची माफी न मागितल्यास…’

‘झूठ की, लूट की, सूट-बूट की सरकार; मित्रांचं उत्पन्न झालं चौपट, शेतकऱ्यांचं मात्र अर्ध’

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.