सर्वसामान्यांचा महिन्याचा खर्च वाढणार, घरगुती सिलेंडरच्या भावात मोठी वाढ

दिल्ली | सध्या सगळ्याच गरजेच्या वस्तू महाग होऊ लागल्या आहेत. त्यातल्या त्यात पेट्रोल आणि डिझेलचे भाग आकाशाला टेकले आहेत. आता दिल्लीच्या नागरिकांना आणखी एक मोठा धक्का बसला आहे.

कारण आता सिलेंडरचेही भाव वाढणार आहेत. जर तुम्ही दिल्लीत राहात असाल तर तुमचा महिन्याचा खर्च वाढणार आहे. दिल्लीमध्ये सिलेंडरच्या भावाने उच्चाकी दर गाठला आहे. सिलेंडरचे हे वाढीव दर येत्या सोमवारपासून लागू करण्यात येणार आहेत.

आता सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला कात्री बसणार आहे. २०२० मध्ये सिलेंडरच्या भावात ५० रूपयांनी वाढ करण्यात आली होती. आताही सोमवारपासून गॅस सिलेंडरसाठी ७६९ रूपये मोजावे लागणार आहेत.

म्हणजे सिलेंडरच्या किंमतीत पुन्हा ५० रूपयांची वाढ करण्यात येणार आहे. याआधी दिल्लीत अनुदान नसलेल्या सिलेंडरचे भाव वाढविण्यात आले होते. विनाअनुदानित सिलेंडरचे भाव ६९४ रूपये होते आणि नंतर हेच भाव ७१९ रूपये करण्यात आले होते.

सिलेंडरचे भाव दिवसेंदिवस वाढत असताना सरकारने २०२२ साठी पेट्रोलियम सब्सिडी हटवून १२ हजार ९९५ करोड रूपये केले आहेत. याच दरम्यान सरकार लवकरच एलपिजी गॅस सिलेंडवरील सब्सिडी रद्द करणार असल्याचे बोलले जात आहे.

घरगुती वापरल्या जाणाऱ्या सिलिंडरच्या विक्रिवर सरकारकडून अनुदान मिळते. अनुदानातील ही रक्कम थेट ग्राहकांच्या बॅक अकाऊंटमध्ये जमा होते. दिवसेंदिवस गरजेच्या वस्तुंचे भाव वाढू लागल्याने नागरीक त्रस्त झाले आहेत.

महत्वाच्या बातम्या
जाणून घ्या ‘लाडाची मी लेक गं’ मालिकेतील मम्मी म्हणजेच स्मिता तांबेचा अभिनय क्षेत्रातील प्रवास
स्वप्नाली पाटीलने आस्तादसाठी घेतला भन्नाट उखाणा, व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल
‘राज’ चित्रपटातील ‘ही’ अभिनेत्री आठवली का? जाणून घ्या आज काय करते
जाणून घ्या केळाच्या फुलांचे फायदे; हृदयविकारापासून ते मधुमेहापर्यंत सर्व रोगांवर आहे उपयुक्त

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.