अरे वा! या ठिकाणी मिळत आहे एलपीजी सिलिंडरवर ५०० रुपयांचा कॅशबॅक

दिल्ली | एलपीजी सिलिंडरच्या वाढत्या किंमतीमुळे नागरिक नेहमी तक्रार करत असतात पण आता याच गॅस सिलिंडरवर थेट ५०० रुपयांचा कॅशबॅक मिळत आहे. या विशेष योजनेअंतर्गत तुम्हाला थेट ५०० रुपयांचा फायदा होणार आहे.

याचा फायदा कसा करून घ्यावा हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. यासाठी तुम्हाला पेटीएम लागेल कारण पेटीएम आपल्या ग्राहकांना एलपीजी सिलिंडर बुक करण्यासाठी ५०० रुपयांचे कॅशबॅक देत आहे.

यासाठी तुम्हाला आधी पेटीएम अँप उघडावे लागेल. त्यानंतर recharge and pay bill सेक्शनमध्ये जा. त्यानंतर बुक सिलिंडर या सेक्शनमध्ये जावे लागेल. आता येथे आपल्याला बुक गॅस सिलिंडर या पर्यायावर जावे लागेल.

त्यानंतर आपली गॅस सिलिंडर एजन्सी निवडा आणि खाली दिलेल्या ऑफरवर क्लिक करा. यामध्ये तुम्हाला ऑफरचे बरेच पर्याय दिसतील. त्यामधून FIRSTLPG पर्याय निवडा. एक लक्षात ठेवा की ५०० रुपयांची ऑफर ही फक्त एफआयआरएसटीएलपीजी या अंतर्गत प्राप्त होत आहे.

पेटीएम ही ऑफर आपल्या ग्राहकांना प्रोत्साहित करण्यासाठी आणि जास्तीत जास्त ग्राहक पेटीएमवरून गॅस बुकिंग करण्यासाठी यावेत यासाठी ही ऑफर चालवत आहे. पण ही ऑफर पहिल्यांदा पेटीएमवरून गॅस बुक करणाऱ्या लोकांसाठीच आहे हे लक्षात ठेवा.

गॅस बुकिंगसोबत तुम्हाला दुसऱ्या बाकी बुकिंगवर सुद्धा बऱ्याच ऑफर्स उपलब्ध आहेत. पेटीएम हे ऑनलाईन पेमेंटचे खूप चांगले आणि फायदेशीर अँप आहे. हइ योजना काही दिवसांसाठी मर्यादित आहे त्यामुळे लवकरात लवकर या ऑफरचा फायदा करून घ्या.

महत्वाच्या बातम्या

बारावीतल्या अल्पवयीन विद्यार्थ्यांनी वर्गातच केले लग्न, व्हीडिओ व्हायरल झाल्यानंतर समोर आला प्रकार

तारक मेहता मालिकेतील कलाकाराची आत्मह.त्या; सुसाईड नोटमधून धक्कादायक सत्य बाहेर

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.