Share

गॅस सिलींडरचा पुन्हा भडका! तब्बल एवढ्या रुपयांनी वाढले भाव, सामान्यांच्या खिशावर ताण

gas cyilender

गेल्या काही दिवसांपासून देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. काही दिवसांपूर्वी सिलेंडच्या किंमतीत देखील वाढ करण्यात आली होती. आता पुन्हा एकदा सिलेंडरच्या किंमतीत तब्बल २५० रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. तेल कंपन्यांनी(Oil Company) व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किंमतीत ही वाढ केली आहे.(gas cyilender price rise with 250 rupess)

या दरवाढीमुळे व्यावसायिक गॅस सिलेंडर वापरणाऱ्या ग्राहकांना मोठा फटका बसला आहे. १ एप्रिलपासून ही दरवाढ लागू करण्यात येणार आहे. घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. त्यामुळे या दरवाढीचा फटका सामान्य ग्राहकांना बसणार नाही. नवीन आर्थिक वर्षाच्या सुरवातीलाच या दरवाढीमुळे व्यावसायिक गॅस सिलेंडर वापरकर्त्या ग्राहकांना मोठा धक्का बसला आहे.

या दरवाढीमुळे मुंबईमध्ये व्यावसायिक गॅस सिलेंडर किंमत आता २,२०५ रुपये झाली आहे. यापूर्वी ही किंमत १,९५५ रुपये होती. दिल्लीमध्ये व्यावसायिक गॅस सिलेंडरचा दर २,२५३ रुपये झाला आहे. याआधी हा दर २,०१२ रुपये होता. तामिळनाडू राज्याची राजधानी असणाऱ्या चेन्नईमध्ये व्यावसायिक गॅस सिलेंडर किंमत आता २४०६ रुपये झाली आहे.

कोलकत्तामध्ये व्यावसायिक गॅस सिलेंडरचा दर २,३५१ रुपये झाला आहे. यापूर्वी हा दर २,०८७ रुपये होता. व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरवाढीचा सर्वात जास्त फटका हॉटेल व्यावसायिकांना बसला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये खाद्यपदार्थांच्या किंमतीत देखील वाढ होण्याची शक्यता आहे. यावेळी हवाई इंधनाच्या दरात देखील वाढ करण्यात आली आहे.

हवाई इंधनाच्या दरात दोन टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. १५ एप्रिलपासून हवाई इंधनाचे नवीन दर लागू होणार आहेत. हवाई इंधनाचा दर आता १,१२,९२५ किलोलीटर झाला आहे. यापूर्वी हा दर १,१०,६६० किलोलीटर इतका होता. देशातील पाच राज्यांच्या निवडणुका झाल्यानंतर सातत्याने इंधनाच्या किंमतींमध्ये वाढ करण्यात आली आहे.

२२ मार्च रोजी घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात ५० रुपयांनी वाढ करण्यात आली होती. त्यानंतर घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. काही दिवसांपूर्वी काँग्रेसने इंधन दरवाढीवरून मोदी सरकारवर निशाणा साधला होता. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी इंधन दरवाढीवरून मोदी सरकारवर टीका देखील केली होती.

महत्वाच्या बातम्या :-
उत्तर कोरियात देश सोडणाऱ्यांना समजतात देशद्रोही, महिलांसोबत केले जाते ‘हे’ भयानक कृत्य
स्टॉक छोटा फायदा मोठा! २ रुपयांच्या ‘या’ स्टॉकने गुंतवणूकदारांना होणार २०० टक्के फायदा, पडणार पैशाचा पाऊस
जर भारताचे चीनशी संबंध बिघडले तर रशिया देणार भारताची साथ, वाचा यामागची प्रमुख कारणे

ताज्या बातम्या इतर

Join WhatsApp

Join Now