रिकाम्या पोटी लसून खाल्ला तर ‘ह्या’ गंभीर आजारांपासून होईल कायमची सुटका

लसूण नसेल कोणत्याही भाजीची फोडणी अपूर्ण असते. लसूण केवळ स्वाद वाढवण्याचे कामच करत नाही तर त्यात अनेक औषधी गुण आहेत. उग्र वासामुळे अनेक जण लसूण खाणे टाळतात. परंतु, त्‍याच्‍या औषधी गुणांची फारच कमी लोकांना माहिती आहे. हजारो वर्षांपूर्वीपासून लसूण औषधी स्‍वरुपात वापरण्‍यात येत आहे.

रिकाम्या पोटी लसूण खाल्ल्याने शरीरासाठी अनेक फायदे होतात. नियमितपणे लसूण खाल्ल्याने ब्लडप्रेशरचा त्रास होत नाही. हाय ब्लडप्रेशरचा तुम्हाला त्रास असेल तर त्यावर लसूण उत्तम. लसूण विविध हृद्यसंबंधी आजारांवर गुणकारी आहे.

पोटाच्या समस्या तसेच डायरियावर लसूण गुणकारी आहे. रिकाम्या पोटी लसूण खाल्ल्याने पोटाच्या समस्या दूर होतात. रिकाम्या पोटी लसूण खाल्ल्याने रक्ताच्या गाठी बनत नाहीत. तसेच हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता ही कमी होते. तसेच लसणीच्या सेवनाने शरीरातील रक्ताभिसरण चांगले राहते.

ट्युबरक्युलॉसिसची समस्या असल्यास सकाळी रिकाम्या पोटी लसूण खावा. लसूण अँटिबायोटिकचे काम करते. लसणीमध्ये अँटी बॅक्टेरियल व वेदना कमी करणारी तत्वे आहेत. त्यामुळे इन्फेक्शन झाल्याने जर दातदुखी सतावत असेल, तर लसणीची एक पाकळी ठेचून जो दात दुखत असेल, तिथे ठेवावी. या उपायाने दात दुखी कमी होण्यास मदत होते.

सकाळी पाण्यासोबत कच्चे लसूण खाल्ल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर फेकले जातात. शरीर डिटॉक्स करण्यासाठी हा एक चांगला उपाय आहे. मधुमेह, नैराश्य आणि कित्येक प्रकारच्या कॅन्सरमुळे तुमचा बचाव देखील होऊ शकतो. लसूणमध्ये अँटी डायबेटीकचे गुणधर्म आहेत. मधुमेहींसाठी लसूण अतिशय लाभदायक आहे.

सकाळी रिकाम्या पोटी लसूण खाल्ल्याने पाचनशक्ती वाढवण्यासाठी तसेच भूक वाढवण्यासाठी लसणीचा वापर होतो. श्वासनाशी संबंधित विकारांमध्ये ही लसणीच्या सेवनाने फायदा होतो. सर्दी-पडसे, खोकला, अस्थमा, निमोनिया, ब्रॉन्कायटीस, इत्यादी विकारांमध्ये लसणीचे सेवन फायदेशीर ठरते.

लसणामध्ये अँटी-ओबेसिटी गुणधर्म असल्याने तुमचे वजन कमी होण्यास मदत मिळते. याव्यतिरिक्त लसूणमुळे शरीरातील फॅट्स देखील कमी होतात. यातील औषधी गुणधर्म वजन कमी करण्यासाठी उपयुक्त आहेत. नियमित सकाळी पाण्यासोबत लसूण खाल्ल्यास पचनाशी संबंधित समस्या देखील कमी होतील.

महत्त्वाच्या बातम्या

भारत घेणार २० जवानांच्या बलिदानाचा बदला, चीनला झटका देण्याची ‘अशी’ आहे योजना

अभिनेता धर्मेंद्रला हिंदू धर्म सोडून मुसलमान व्हावे लागले; यामागे आहे ‘हे’ धक्कादायक कारण

केवळ बटाट्याची शेती करुन या गावातील लोक झाले करोडपती; वाचा शेतकऱ्यांची प्रेरणादायी कहाणी

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.