गणपतराव देशमुख: पांढरा शर्ट, हातात एक बॅग आणि बसमध्ये प्रवास करणारे एकमेव आमदार, वाचा त्यांच्याबद्दल..

महाराष्ट्रातल्या राजकारणातले भीष्माचार्य म्हणून ओळखले जाणारे गणपतराव देशमुख यांचे वृद्धपकाळाने निधन झाले. ते ९६ वर्षांचे होते. आज आम्ही तुम्हाला त्यांच्याबद्दल माहिती सांगणार आहोत. त्यांना महाराष्ट्रातल्या राजकारणातले भीष्माचार्य ही उपाधी त्यांना त्यांच्या राजकारणातल्या अनुभवामुळे देण्यात आली आहे.

अनेक रथी महारथींना त्यांनी राजकारणात धुळ चारली होती. पण त्यांना हरवेल असा एकही नेता जन्माला आला नाही. गणपतराव देशमुख यांनी ११ वेळी आमदारकीचे पद भुषविले होते. सांगोल्यासारख्या दुष्काळी भागात त्यांनी आनंदवन फुलवले होते.

ते शेतकरी कामगार पक्षात आघाडीचे नेते होते. त्यांनी शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी आघाडीची भुमिका निभावली होती. महाराष्ट्रातील अनेक बड्या नेत्यांसोबत त्यांनी अनेक वर्षे काम केले आहे. २०१९ च्या विधानसभेनंतर त्यांनी राजकारणातून सन्यास घेतला होता.

कोणताही पक्ष असो अगदी विरोधी पक्षातील नेतेही त्यांचा आदर करायचे. त्यांना सामान्य लोक खुप मानायचे. जेव्हा त्यांनी राजकारणातून सन्यास घेतला तेव्हा अनेक लोकांनी त्यांना राजकारणात परतण्यासाठी आग्रह केला होता. ते जरी आमदार होते पण ते एका सामान्य माणसासारखे वागायचे.

महाराष्ट्रातच नव्हे तर संपुर्ण देशाला आदर्श वाटतील असे ते होते. ते प्रत्यक्ष जाऊन आपल्या मतदारसंघातील लोकांची विचारपूस करायचे. अंगात पांढरा शर्ट, हातात एक बॅग, कधी एसटीने प्रवास करत नागपुर गाठून लोकांची, कार्यकर्त्यांची विचारपूस करणाऱ्या गणपतराव देशमुखांवर लोकांचा खुप जीव होता.

भारताला स्वातंत्र्य मिळायच्या आधी सोलापूर जिल्ह्याच्या सांगोला जिल्ह्यात गणपतरावांचा जन्म झाला होता. १० ऑगस्ट १९२६ रोजी त्यांचा जन्म झाला होता. सुरूवातीपासूनच त्यांना कोणावर झालेला अन्याय सहन होत नव्हता. त्यांनी नेहमी दिन दुबळ्यांना न्याय देण्यासाठी आपला हात पुढे सरसावला होता.

त्यांच्यामध्ये सुरूवातीपासूनच सामाजिक जाणीव होती. त्यांनी वकीलीचं शिक्षण घेतलं होतं त्यामुळे त्याचा फायदा घेत त्यांनी अनेकांना कायदेशीररित्या न्याय मिळवून दिला. त्याचवेळी त्यांनी राजकारणात येण्याचा निर्णय घेतला. मग वयाच्या ३४ वर्षी त्यांनी आमदारकीची पहिली निवडणूक लढवली होती.

त्या पहिल्या निवडणूकीत ते विजयी झाले. त्यावेळी साल होते १९६२. तेव्हापासून ते २०१९ पर्यंत ११ वेळा त्यांनी निवडणूक जिंकली होती. २०१४ ला त्यांनी सलग १० वेळा आमदारकी जिंकणाऱ्या एम. करूणानिधी यांच्या विक्रमाची बरोबरी केली होती.

वकीलीसाठी त्यांनी सांगोला गाठला होता. संयुक्त महाराष्ट्र चळवळ सुरू होती तेव्हाचा काळ होता. या लढाईत त्यांनी सहभाग घेतला. ते बाहेरच्या तालुक्यातील अशी टीका अनेक लोकांनी त्यांच्यावर केली. यावर मात करत वयाच्या ३४ वर्षी त्यांनी आमदारकीची निवडणूक जिंकली होती.

ते एकमेव ज्येष्ठ नेते असतील ज्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणाला अगदी सुरूवातीपासून पाहिले आहे. १९७८ च्या पुलोद आणि १९९९ मधलं आघाडी सरकारमध्ये त्यांच्याकडे काही काळ मंत्रिपद होते. उरलेला वेळ त्यांनी विरोधी पक्षनेते म्हणून पद सांभाळले होते.

आशिया खंडातील सर्वोत्कृष्ट सुतगिरणीचा मान त्यांच्या सांगोल्यातील सुतगिरणीने पटकावला होता. यशवंतराव चव्हाण ते मागच्या सरकारमधील माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अशा सर्व मुख्यमंत्र्याच्या नेतृत्वातली अधिवेशनात त्यांनी प्रखर मते मांडली आहेत.

एकदा ते पुण्याहून सोलापूरला एसटीने प्रवास करत होते तेव्हा त्यांना कंडक्टरने तिकीटाची विचारणा केली. तेव्हा त्यांनी कंडक्टरला सांगितले की मी आमदार आहे. तेव्हा बसमध्ये कोणालाही विश्वास बसला नाही. अशा सामान्य माणसातील आमदार आज सगळ्यांना सोडून गेले. देव त्यांच्या आत्म्यास शांती देवो. तुम्हाला हा लेख कसा वाटला आम्हाला कळवा. जर ही माहिती आवडली असेल तर पुढे पाठवायला विसरू नका.

महत्वाच्या बातम्या
…अन् उठल्यावर बघतो तर काय तीन हिंस्त्र चित्ते त्याच्याबाजूला झोपलेले; पहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
‘सुंदरा मनामध्ये भरली’ मालिकेच्या टीमने कोकणवासियांसाठी केली कळकळीची विनंती; व्हिडिओ पाहून येईल डोळ्यात पाणी
…म्हणून ऑलिम्पिक मेडल जिंकल्यानंतर ‘त्या’ ट्रक ड्रायव्हर्सला शोधतेय मीराबाई चानू
मुळव्याध बरा करण्यासाठीचा अघोरी उपाय बेतला जीवावर; ढूंगनातून घातला २० सेमी लांबीचा मासा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.