गणपती-दिवाळीत यंदाही शुकशुकाट; ऑक्टोबरमध्ये कोरोनाची भयंकर स्थिती निर्माण होणार

मुंबई। देशात गेले वर्ष दीड वर्ष कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. त्यामुळे सरकारकडून देशात कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. अशातच कोरोनाचा धोका झपाट्याने वाढल्याने संपूर्ण देशात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. त्यामुळे गेल्या वर्षी देशात कोणतेही सण उत्सव साजरे करण्यात आलेली नाहीत.

तसेच सार्वजनिक ठिकाण बंद करण्यात आल्यानं कोणालाही गेले वर्षभर घराच्या बाहेर पडता आलेले नाही. तसेच लॉकडाऊन असल्याने कोणतेही सण साजरे करता आलेली नाही. मात्र यावर्षी पण नागरिकांना कोणतेही सण साजरे करण्यात येणार नसल्याची निराशाजनक माहिती समोर आली आहे.

कारण कोरोना विषाणूमुळे एका मागोमाग एक संकट येत आहे, अशातच कोरोनाची दुसरी लाट संपत नाही तोपर्यंत आता शास्त्रज्ञांनी तिसऱ्या लाटेचा इशारा दिला आहे. शास्त्रज्ञांच्या मते, ऑगस्ट महिन्यात सुरू झालेली कोरोना विषाणूची तिसरी लाट ऑक्टोबर महिन्यात अत्यंत भयंकर असू शकते.

त्यामुळे यंदाही गणपती आणि दिवाळी कोरोना विषाणूच्या सावटाखाली असणार आहे. दुसऱ्या लाटेत भारताची झालेली वाईट अवस्था पाहता, तिसऱ्या लाटेत परिस्थिती कशी असेल, याची चिंता प्रशासनाला लागली आहे. हैदराबाद आणि कानपूरच्या आयआयटीमधील संशोधक मथुकुमल्ली विद्यासागर आणि मनींद्र अग्रवाल यांनी याबाबतचं संशोधन केलं आहे.

गणितीय मॉडेलचा वापर करून देशात कोरोना स्थिती काय असेल, याचा अंदाज त्यांनी वर्तवला आहे. . रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता, केंद्र सरकारनं केरळ, महाराष्ट्र आणि ईशान्य प्रदेशासह 10 राज्यांना इशारा दिला आहे.

वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारांनी कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी कडक पावलं उचलावीत, असं आवाहन केलं आहे. कोरोना विषाणू डेल्टा व्हेरिअंट कांजण्याप्रमाणे वेगात पसरू शकतो, असा इशारा तज्ज्ञांकडून देण्यात आला आहे. त्यामुळे आता प्रशासनानं वेळेचं सावधगिरी बाळगून सतर्क राहणे आवश्यक आहे.

मागील काही महिन्यांची कोरोना परिस्थिती पाहता राज्य सरकारकडून काही जिल्ह्यांमध्ये निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. मात्र अद्यापही कोरोना रुग्ण आढळत असल्याने केंद्र सरकारनं केरळ, महाराष्ट्र आणि ईशान्य प्रदेशासह 10 राज्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
महत्वाच्या बातम्या
ही गाडी घालणार मार्केटमध्ये धुमाकूळ, केवळ 8 मिनिटांत चार्ज, रेंजचे तोडले सर्व विक्रम, वाचा..
वेदनादायी! 16 कोटींच्या इंजेक्शनंतरही 11 महीन्यांच्या वेदिकाची मृत्यूशी झुंज अपयशी
२ रुपयाचे हे नाणं तुम्हाला बनवेल लखपती, जाणून घ्या, कसे मिळतील पैसे…
काय सांगता! अभिनेत्री जान्हवी कपूर करणार लवकरच लग्न; असा असेल मुलगा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.