Share

गंगुबाई काठियावाडी थिएटरवर ठरली फ्लॉप, साऊथच्या ‘या’ दोन चित्रपटांच्या निम्मीही झाली नाही कमाई

आलिया भट्टच्या ‘गंगूबाई काठियावाडी’ या चित्रपटाच्या एक दिवस आधी प्रदर्शित झालेल्या साऊथचा सुपरस्टार अजितचा तामिळ चित्रपट ‘वालीमाई’ने रिलीजच्या पहिल्याच दिवशी धुमाकूळ घातला आहे. यासोबतच रिलीज झालेला अभिनेता पवन कल्याणच्या ‘भीमला नायक’ या चित्रपटालाही दमदार ओपनिंग मिळाली आहे. या दोन्ही चित्रपटांसह प्रदर्शित झालेल्या ‘गंगुबाई काठियावाडी’ या हिंदी चित्रपटाचा पहिलाच दिवस निराशाजनक ठरला आहे. (gangubai kathiyawadi flop)

गेल्या दोन वर्षांत साऊथच्या चित्रपटांनी हिंदी चित्रपटांपेक्षा जास्त कमाई केली आहे. यावेळी चित्रपटगृहांची संख्या कमी असलेल्या भागात ‘गंगुबाई काठियावाडी’ चित्रपटाचा अधिक प्रमोशन करण्यात आले आहे. त्यामुळे याचा फटका ‘गंगुबाई काठियावाडी’ चित्रपटाला बसताना दिसत आहे.

‘गंगुबाई काठियावाडी’ हा चित्रपट सलमान खानने भन्साळींच्या ‘इंशाअल्लाह’ या चित्रपटात काम करण्यास नकार दिल्यानंतर घाईघाईने बनवलेला चित्रपट आहे. केवळ आलिया भट्टच नाही तर हा चित्रपट संजय लीला भन्साळी यांच्या कारकिर्दीतील एक टर्निंग पॉईंट आहे, ज्यांची मोठी चित्रपट निर्मिती कंपनी या चित्रपटासाठी पैसे गुंतवण्यास तयार नव्हती.

चित्रपटाचे OTT हक्क नेटफ्लिक्सला आणि सॅटेलाइट हक्क झी सिनेमाला विकून, जयंती लाल गडा यांनी चित्रपटाच्या प्रचंड खर्चाचा मोठा भाग वसूल केला आहे, परंतु चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कामगिरीवर त्याचे खरे भवितव्य ठरवले जाईल. कलंक आणि सडक २ नंतर ही तिसरी वेळ आहे, जेव्हा आलिया भट्टला तिच्या सर्व मेहनतीनंतरही अपेक्षित परिणाम मिळालेला नाही.

दोन वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या धर्मा प्रॉडक्शनच्या ‘कलंक’ चित्रपटाने आलिया भट्टच्या चित्रपटांच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये ओपनिंग डेच्या बाबतीत सर्वाधिक कमाई केली. या चित्रपटाने २१.६० कोटींची ओपनिंग करून धमाल केली परंतु पहिल्याच दिवशी या चित्रपटाला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला, पण नंतर मात्र तो काही कमाल करु शकला नाही. पहिल्या वीकेंडमध्ये हा चित्रपट केवळ ६२.७५ कोटींची कमाई करून चित्रपट फ्लॉप घोषित करण्यात आला.

‘गंगूबाई काठियावाडी’ या चित्रपटाच्या शुक्रवारी रात्रीपर्यंतच्या आकडेवारीनुसार, पहिल्या दिवशी या चित्रपटाने जवळपास नऊ कोटींची कमाई केली. पण या चित्रपटाकडून सर्वांना खुप अपेक्षा आहे. त्यामुळे हा चित्रपट एकाच दिवसात १० कोटींची कमाई करेल अशी अपेक्षा दिग्दर्शक आणि निर्मात्यांना आहे.

दरम्यान, पवन कल्याणच्या ‘भीमला नायक’ या चित्रपटाने रिलीजच्या पहिल्या दिवशी सुमारे ३५ कोटी रुपयांचे कलेक्शन केल्याचे वृत्त आहे, तर अजितच्या ‘वालीमाई’ या चित्रपटाचे पहिल्या दिवसाचे कलेक्शन २५.३० कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे.

महत्वाच्या बातम्या-
रात्रीचं जेवण केलं अन् मृत्यूच्या दाढेत अडकलं कुटुंब; विषबाधेमुळे आई अन् तीन मुलांचा मृत्यू
युक्रेनच्या राष्ट्रपतींचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; काय झालं नेमकं संभाषण वाचा सविस्तर….
‘मी काहीही चोरलेले नाही…, मात्र, तुम्ही भिकारी’, घरात काहीच न मिळाल्यानं चोराची सटकली

बाॅलीवुड मनोरंजन

Join WhatsApp

Join Now