अभिनेत्री आलिया भट्टचा(Alia Bhatt) ‘गंगुबाई काठियावाडी’ हा सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या सिनेमाने आतापर्यंत तिकीटबारीवर ७० कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. या चित्रपटातील आलियाच्या भूमिकेला प्रेक्षकांकडून आणि समीक्षकांकडून मोठी पसंती मिळत आहे. पण गंगुबाई या भूमिकेसाठी आलिया भट्टच्या आधी या अभिनेत्रींना चित्रपटाचे दिग्दर्शक संजय लीला भन्साळी(Sanjay Leela Bhansali) यांनी ऑफर दिली होती.(gangubai kathiyavadi film offer these actress)
अभिनेत्री प्रियांका चोप्राला(Priyanka Chopra) या चित्रपटाची ऑफर देण्यात आली होती. पण त्यावेळी अभिनेत्री प्रियांका चोप्रा हॉलिवूड चित्रपटांच्या चित्रीकरणात व्यस्त होती. यामुळे तिने गंगुबाईची भूमिका करण्यास नकार दिला होता. त्यानंतर अभिनेत्री राणी मुखर्जीला देखील गंगुबाई काठियावाडी’ हा चित्रपट ऑफर करण्यात आला होता. पण काही काळानंतर राणी मुखर्जी आणि या चित्रपटाच्या निर्मात्यांमध्ये कोणतीही चर्चा झाली नाही.
अभिनेत्री राणी मुखर्जीने दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या ‘ब्लॅक’ आणि ‘सावरिया’ या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. ‘गंगुबाई काठियावाडी’ हा चित्रपट अभिनेत्री दीपिका पदुकोनला ऑफर करण्यात आला आहे आणि दीपिका चित्रपटामध्ये गंगुबाईची भूमिका साकारणार आहे, असं म्हंटल जातं होते. पण अखेर या चित्रपटामध्ये गंगुबाईच्या भूमिकेसाठी अभिनेत्री आलिया भट्टची निवड झाली.
‘गंगुबाई काठियावाडी’ या सिनेमाने पहिल्याच दिवशी १०.५० कोटींचा गल्ला जमवला होता. शनिवारी या सिनेमाने १३.३२ कोटी रुपयांची कमाई केली होती . एवढेच नाही तर रविवारी या सिनेमाने बॉक्स ऑफिसर १६.५० कोटी रुपयांची कमाई केली होती. या सिनेमाने फक्त तीन दिवसांत ४० कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई केली होती.
अभिनेत्री आलिया भट्टचा ‘गंगूबाई काठियावाडी’ हा चित्रपट रिलीजपूर्वीच वादात सापडला होता. गंगूबाईच्या कुटुंबियांनी या चित्रपटाला विरोध दर्शवला होता. गंगूबाईने समाजासाठी काम केले होते, पण तिला सेक्स वर्कर म्हणून दाखवण्यात आल्याने गंगूबाईचे कुटुंबीय चित्रपटाच्या निर्मात्यांवर नाराज झाले होते. या चित्रपटाविरोधात गंगुबाईच्या कुटुंबियांनी न्यायालयातही धाव घेतली होती.
गंगूबाईच्या कुटूंबियांच्या वकिलांनी न्यायालयात सांगितले होते की, ट्रेलर पाहून गंगुबाईच्या कुटुंबीयांना धक्का बसला आहे. समाजासाठी इतकं काम करणाऱ्या महिलेला सेक्स वर्कर म्हणून दाखवलं आहे. गंगूबाईचे चित्रण ज्या पद्धतीने केले आहे ते चुकीचे आणि निराधार आहे. हे अश्लील आहे. एका समाजसेविकेला तुम्ही वेश्या म्हणून सादर केले आहे. हे कोणत्या कुटुंबाला आवडेल? असे ते गंगूबाईच्या कुटूंबियांचे वकील म्हणाले होते.
महत्वाच्या बातम्या :-
२५ वर्षीय युवा क्रिकेटरचा ४० मिनिटांत ९० वेळा थांबला श्वास, रुग्णालयात हार्ट अटॅक आला अन्…
१६ वर्षांपूर्वीची परंपरा सोलापुरकरांनी राखली, नागराजचे असे काही स्वागत केले की तो ही झाला चकित
VIDEO: राज ठाकरेंविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणे पडले महागात; मनसे कार्यकर्त्यांनी धिंड काढत दिला चोप