गृहमंत्री वळसे पाटील यांच्या आंबेगाव तालुक्यात भरदिवसा हत्या; सराईत गुन्हेगाराच्या डोक्यात घातल्या गोळ्या

पुण्यात गुन्हेगारीच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहे. असे असताना राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या पुण्यातील आंबेगाव तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

आंबेगाव तालुक्याच्या एकलहरे गावात एका सराईत गुन्हेगाराला गोळ्या झाडण्यात आल्या आहे. भरदिवसा ही हत्या करण्यात आली आहे. या हत्यामुळे संपुर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

एकलहरे गावात कुख्यात गुंड ओंकार यांच्यावर आरोपींनी भरदिवसा गोळ्या झाडल्या आहे. त्यानंतर सर्व आरोपी पळून गेले. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. गुंडाना आता गुन्हा करताना कोणाचीही भिती राहिलेली नाही. त्यामुळे आता नागरीकांमध्येही दहशतीचे वातावरण निर्माण झालेले आहे.

या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला आणि घटनेचा तपास सुरु केला आहे. जुन्या वादातून ओंकारची हत्या करण्यात आल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

पोलिस या हत्येचा तपास करत आहे. पण ही घटना गावात घडली आहे. त्यामुळे आता पोलिसांना सीसीटीव्ही फुटेजही मिळणे शक्य होणार नाही. यामुळे आता आरोपींना शोधून त्यांना अटक करणे हे पोलिसांसाठी मोठे आव्हान असणार आहे.

दरम्यान, आंबेगाव तालुक्यात गुन्हेगारीच्या घटना प्रचंड वाढल्या आहे. धक्कादायक म्हणजे पंचवीशीतले तरुणही गुन्हेगारी क्षेत्राकडे वळत आहे. त्यामुळे अल्पवयीन गुन्हेगारांची संख्याही वाढत चालली आहे. तरुण पिढी अशा गुन्हेगारीकडे वळत असल्यामुळे हा चिंतेचा विषय ठरला आहे.

महत्वाच्या बातम्या-

धक्कादायक! पुण्यातील १७ वर्षीय तरुणीची आत्महत्या, दहावीला मिळाले होते ९५ टक्के
प्रसिद्ध प्रवचनकार जया किशोरी यांचा लग्नाबद्दल मोठा खुलासा, म्हणाल्या लग्न करणार, पण…
हस्तमैथुनाची सवय बेतली जीवावर; ५१ वर्षांच्या माणसाने केले अतिप्रमाणात हस्तमैथुन अन् पुढे…

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.