भयावह! उत्तरप्रदेशात गंगाकिनारी विदारक स्थिती, जिकडे पहावे तिकडे वाळूत पुरलेल्या मृतदेहांचा खच

देशात कोरोना रुग्णसंख्या वाढत असताना अनेक ठिकाणी रुग्णांचे मोठे हाल होत असून त्यांना रुग्णालयात ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटर देखील उपलब्ध होत नाहीत. असे असताना उत्तर प्रदेशमधून धक्कादायक प्रकार समोर येत आहेत. येथे मृतदेह गंगा नदीमध्ये पुरण्यात येत आहेत.

उत्तर प्रदेशमध्ये मृतांची संख्या वाढल्याने लाकडांची टंचाई आल्याचे सांगितले जात आहे. यामुळे अग्नी देण्याऐवजी मृतदेह वाळूत पुरण्याची वेळ आली आहे. यामुळे हे मृतदेह देखील वाहून जात आहेत.

संगमनगरी अशी ओळख असलेल्या प्रयागराजमध्ये असलेल्या गंगा नदीच्या तिरावर अनेक मृतदेह पुरण्यात आले आहेत. दररोज नदी किनारी असलेल्या वाळूत मृतदेह पुरले जात आहेत. मृतदेह पुरले गेल्यानंतर त्याच्या चारही बाजूंनी बांबू उभारण्यात येत आहेत.

यामुळे उत्तर प्रदेशमध्ये किती भयानक परिस्थिती आहे हे दिसून येत आहे. हिंदू धर्मात मृतदेहांना अग्नी दिला जातो. मात्र गेल्या काही दिवसांमध्ये उत्तर प्रदेशातील मृतांचा आकडा झपाट्याने वाढला आहे. यामुळे प्रशासन हतबल झाले आहे.

मृतांचा आकडा इतका वाढला आहे की अंत्यविधीसाठी लाकडदेखील मिळत नाहीत. यामुळे प्रशासनाने मृतदेह नदीत पुरण्याचा निर्णय घेतला आहे. याठिकाणी रोज शेकडो जणांवर अंत्यसंस्कार केले जात आहेत.

तसेच लाकडांची टंचाई जाणवू लागल्याने कंत्राटदारांनी लोकांकडून जास्त पैसे घेण्यास सुरुवात केली. त्यामुळे लोकांनी मृतदेहांना अग्नी देण्याऐवजी ते पुरण्यास सुरुवात केली. असेही सांगितले जात आहे. योगी प्रशासनावर यामुळे टीका केली जात आहे.

ताज्या बातम्या

सुप्रीम कोर्टानंतर आता रघुराम राजन यांनी केंद्राला झापले, म्हणाले, महाराष्ट्राला जमले मग देशाला का नाही?

डोळ्यादेखत रुग्ण जीव सोडताहेत, आम्हाला काहीच करता येत नाही; फेसबूक लाईव्हमध्ये डॉक्टर ढसाढसा रडले

पंतप्रधान नेत्यानाहूंनी इस्रायलला पाठींबा देणाऱ्या सर्व देशांचे मानले आभार; मात्र भारताचे नावही नाही घेतले

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.