गंगेत वाहून आलेल्या मृतदेहांमागील खरी कारणं आली समोर; कारणं वाचून तुम्हाला बसेल धक्का

देशभरात कोरोनाच्या संकटाने थैमान घातले आहे. झपाट्याने कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असाताना कोरोना रुग्णांचा मृत्यु पण होत आहे. अशात अनेक धक्कादायक घटनाही देशात घडत आहे. काही दिवसांपुर्वी गंगेत मृतदेह आढळून आले होते.

गंगेत अशाप्रकारे वाहून येणाऱ्या मृतदेहांवर अनेक प्रश्न उपस्थित केले गेले होते. हे मृतदेह कुठुन आले? हे मृतदेह वाहून आले, तर या लोकांचा मृत्यु कशामुळे झाला आहे?,असे प्रश्न सर्वांनी उपस्थित केले होते. आता एका वृत्त संस्थेने यामागील कारण शोधली असता धक्कादायक माहिती समोर आली आहे.

उन्नाव आणि गाझीपुर परिसरात हे मृतदेह आढळून आले होते. तिथल्या स्थानिक नागरीकांची, मृताचे नातेवाईकांशी चर्चा करण्यात आली. तेव्हा या सर्व गोष्टीला पारंपारीक रुढी आणि कोरोना संकट हे कारणीभुत असल्याची माहिती मिळाली आहे. विशेष गंगेत वाहून आलेल्या मृतदेहांपैकी अनेक मृतदेहांची नोंदही करण्यात आलेली नाही.

बिहार सीमेच्या ७ किलोमीटर अंतरावर गमघर घाट आहे. तिथे जिल्हा प्रशासन, पोलिस, स्थानिक रहिवासी मृतदेहांची विल्हेवाट लावण्याचे काम करत आहे. हे दृष्य यापुर्वी मी कधीही पाहिले नव्हते. नदीतील मृतदेह बाहेर काढण्यासाठी बोटींचा वापर केला जात आहे.गंगेचे पात्र या ठिकाणी वळण घेते, त्यामुळे त्यामुळे इथे ८० पेक्षा जास्त मृतदेह जमा झाले आहे, असे तिथे काम करणाऱ्या कमला देवी डोम यांनी म्हटले आहे.

तसेच भास्कर घाटावर काम करणाऱ्या प्रदिप कुमार यांनी पण धक्कादायक माहिती दिली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अंत्यसंस्कार करण्याच्या खर्चात मोठी वाढ झाली आहे. आधी खर्च हा पाचशे रुपयांच्या आसपास होता, पण आता हाच खर्च दोन हजार इतका झाला आहे.

पैशांममुळे अनेक लोक मृतदेहांचा अंत्यसंस्कार करत नाहीये. १५ दिवसांपुर्वी एका व्यसनी माणसाचा मृतदेह वाळूत पुरण्यात आले होते. पण पावसामुळे वाळू वाहून गेली आणि त्यानंतर कुत्र्यांनी तो उकरून काढला. अनेक लोक वाळूमध्येच मृतदेह पुरत आहे, कारण ते मृतदेहांचा अंत्यसंस्कार करु शकत नाही, असे प्रदिप कुमारने म्हटले आहे.

तसेच भास्कर घाटावर मृतदेह दफन करणे, हे इथली रुढी परंपरा आहे. पण आम्ही नागरीकांचे मन परिवर्तन करण्याचा प्रयत्न करत आहोत. खुप वर्षांपासून हे चालत आहे. उन्नाव, फतेहपुर, रायबरेली इतकेच नाही, तर कानपुरवरुनही इथे लोक अंत्यसंस्कारासाठी येत असतात, असे उन्नावचे जिल्हाधिकारी रविंद्र कुमार यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या-

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या लहान भावाचे कोरोनामुळे निधन
‘या’ महिलेने सर्वात मोठा दरोडा घालत जगाला लावलाय तब्बल ९० हजार कोटींचा चुना; FBI-MI5 घेतेय तिचा शोध
लॉकडाऊनमुळे घरकाम करणाऱ्या महिलेच्या परिस्थितीची कहाणी ऐकून पोलिसांचे डोळेही पाणावले, म्हणली…

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.